आरक्षणासाठी आरपारची लढाई! २९ ऑगस्टपासून उपोषण, जरांगेंचा मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आरक्षणाचा प्रश्न उपोषणादरम्यानही निकाली निघाला नाही, तर उपोषण सुरू असतानाच मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

जरांगे यांचे पुढील आंदोलन मुंबईत होणार की अंतरवाली सराटीत, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यावर पडदा टाकत त्यांनी उपोषण अंतरवाली सराटीतच होणार असल्याचे सांगितले.



मुंबईतील संभाव्य आंदोलनासाठी नियमानुसार परवानगी अर्जही दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना, त्यांच्या भूमिकेमुळेच आपल्यावर पुन्हा उपोषणाची वेळ आल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

त्यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला. शिंदे आणि शिरसाट यांच्यात मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त करत, मराठा-कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरही त्यांनी शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले.राठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल आणि थेट मुंबई गाठली जाईल, असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

Manoj Jarange to Begin Fast at Antarwali Sarati from August 29

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात