CJP कॉकरोज जनता पार्टीने सुरू केलेल्या आणि सगळ्या विरोधकांनी सामील होऊन चिघळलेल्या आंदोलनाचे खरे टारगेट मोदी – शहाच आहेत, म्हणून तर काल राहुल गांधींनी लोककल्याण मार्गावर जाऊन मोदींच्या अधिकृत निवासस्थानी निदर्शने केली. पण कितीही आंदोलने केली आणि गदारोळ केला, तरी मोदी – शाह हे ऐकणार नाहीत, हे माहिती असल्यामुळेच कॉकरोच जनता पार्टी आणि बाकीच्या विरोधकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना target केले, पण ते खऱ्या अर्थाने विरोधकांचे soft target च आहेत.
– विरोधकांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य पुसले
याची कारणे साधी आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह किंबहुना संघ परिवाराला हवा असलेला शैक्षणिक अजेंडा धर्मेंद्र प्रधानांनी अचूक आणि कौशल्याने अंमलात आणला. त्यामुळे काँग्रेसी आणि कम्युनिस्ट परिवाराचे डोके फिरले. त्यांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य पुसले गेले म्हणूनच ते चिडले आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांना target केले.
वास्तविक नीट (NEET) परीक्षा एनटीए (NTA) म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते, त्याचे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी आहेत. पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांपैकी कुणीही केली नाही. यापूर्वीही परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. तरीसुद्धा सगळे फक्त धर्मेंद्र प्रधान यांनाच का टार्गेट करत आहेत?
– तर याची कारणे अशी :
कारण धर्मेंद्र प्रधान यांनी असा अभ्यासक्रम बदलला, की जो अनेक वर्षांपासून विकृत आणि दिशाभूल करणाऱ्या नॅरेटिव्हला चिथावणी देत होता. प्रधानांनी आणीबाणीवर (१९७५-७७) प्रकरणे अभ्यासक्रमात समाविष्ट केली. मुघल इतिहासावरील अतिरिक्त भर कमी केला. भारताचा स्वतःचा सभ्यता आणि सांस्कृतिक इतिहास समाविष्ट केला. भारतीय वीरांच्या कथा आणि शौर्य समाविष्ट केले. सर्जिकल स्ट्राईकसारख्या आधुनिक लष्करी कारवायांचा अभ्यासक्रमात समावेश केला. मराठे, चोल आणि मौर्य यांसारख्या प्रादेशिक राजवंशांना अधिक महत्त्व दिले. मातृभाषा आणि प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन दिले.
– विरोधकांच्या हाती लागेल धत्तूरा
नेमके हेच मुद्दे काँग्रेसी आणि कम्युनिस्ट विचारवंतांना खटकले. त्यांना राष्ट्रीय अजेंड्याचे शिक्षण हिंदुत्ववादी अजेंड्याचे वाटले या अजेंड्याचे शिक्षण घेणारी पुढची पिढी तयार झाली, तर आपले सगळेच मुसळ केरात जाईल, याची भीती काँग्रेसी आणि कम्युनिस्ट विचारवंतांना वाटली. त्यामुळेच मोदी – शाह आणि संघ परिवाराला एकदम धक्का देता येणार नाही हे पाहून त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांना soft target केले. पण जर या आंदोलनाचा परिणाम होऊन खरंच धर्मेंद्र प्रधान हटले किंवा त्यांना हटविले, तरी मोदी – शाह आणि संघ परिवार राष्ट्रीय शिक्षणाचा अजेंडा बाजूला सारण्याची कुठलीही शक्यता नाही किंबहुना guarantee च नाही. एक धर्मेंद्र प्रधान गेले, तर दुसरे धर्मेंद्र प्रधान येतील आणि ते जास्त अचूकपणे आणि कौशल्याने राष्ट्रीय शिक्षणाचा अजेंडा राबवतील. त्यात मोदी शाह आणि संघ परिवार स्वतः लक्ष घालतील. काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या हातात फक्त धत्तूरा लागेल. यापेक्षा या आंदोलनाचा वेगळा परिणाम दिसण्याची शक्यता सध्या तरी नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App