नाशिक : एकीकडे काँग्रेसचा विश्वासघात झाल्याचा आरोप, तर दुसरीकडे काँग्रेसने विश्वासघात केल्याचा आरोप!!, अशाप्रकारे INDI आघाडीच्या बैठकीपूर्वीच विरोधकांची दैना झाली. आघाडीच्या बैठकीवर बहिष्काराचे सावट पडले. INDI alliance
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आठ जून रोजी INDI आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांची बैठक नवी दिल्लीमध्ये बोलविली. त्या बैठकीचे निमंत्रण सगळ्या घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना धाडले. पण त्या बैठकी आधीच INDI आघाडी मधल्या घटक पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली.
– शरद पवारांनी उमेदवार घेतला मागे
याची पहिली झलक पुण्यात मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या निवडणुकीत पुण्याच्या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे बिनविरोध निवडून आले पण त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्यात राजकीय साटे लोटे झाले. सुनेत्रा पवारांनी स्वतः शरद पवारांना फोन करून त्यांच्या पक्षाचा उमेदवार माघारी घ्यायची विनंती केली. शरद पवारांनी सुनेत्रा पवारांची विनंती मान्य करून श्रीकांत पाटलांना उमेदवारी मागे घ्यायला लावली.
– शरद पवारांनी विश्वासघात केल्याचा आरोप
पण या सगळ्या घडामोडीतून शरद पवारांनी काँग्रेसचा विश्वासघात केला. वास्तविक पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा काँग्रेसची मते जास्त आहेत पण तरीसुद्धा शरद पवारांनी काँग्रेसकडून पुण्याची जागा स्वतःच्या पक्षासाठी मागून घेतली होती त्या जागेवरच त्यांनी श्रीकांत पाटलांना उभे केले होते. पण श्रीकांत पाटलांना नंतर त्यांनीच माघार घ्यायला लावली. त्यामुळे तिथे काँग्रेसची लढाईची संधी हुकली. ती शरद पवारांनी हुकवली. त्यामुळे एकेकाळी त्यांचेच अनुयायी आणि आता पुणे काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांवर काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्याची निवडणूक लढवायची नव्हती तर त्यांनी उमेदवारीच मागायची नव्हती. ती जागा काँग्रेसला सोडून द्यायची होती. काँग्रेसचा उमेदवार तिथून लढला असता. त्यामुळे महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढत असल्याचा चांगला संदेश गेला असता. पण शरद पवार महायुती पुढे झुकले आणि त्यांनी काँग्रेसचा विश्वासघात केला, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला.
– राहुल गांधींच्या बैठकीवर DMK चा बहिष्कार
त्याचवेळी दुसरी बातमी तामिळनाडू मधून आली. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळकम आणि काँग्रेस यांची आघाडी होती. या आघाडीचा तिथे पराभव झाला त्याबरोबर काँग्रेसने आघाडीतून बाहेर पडून मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या गोटात शिरून पक्षाच्या नेत्यांच्या पदरात मंत्रिपदे पाडून घेतली. त्यामुळे द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसवर विश्वासघाताचा आरोप केला. राहुल गांधींनी जरी INDI आघाडीची बैठक बोलावली असली, तरी त्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते आता INDI आघाडीच्या बैठकीला हजर राहणार नाहीत.
त्यामुळे INDI आघाडीची बैठक प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वीच घटक पक्षांमधले मतभेद समोर आले आणि बैठकीवर बहिष्काराचे सावट आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App