नाशिक : पवार ब्रँडच्या प्रभावाचे मुसळ केरात गेल्याची वस्तुस्थिती; म्हणूनच वाटली पवार विरुद्ध पवार लढतीची भीती!!, हीच राजकीय वस्तुस्थिती गेल्या दोन दिवसांमधल्या काही मुलाखतींमधून समोर आली.Political value of Pawar brand eroding
सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत पवार विरुद्ध पवार अशी बारामतीत लढत होऊ देणार नाही. प्रसंगी आपण स्वतः काही वेगळी भूमिका घेऊ, अशी प्रतिज्ञा केली. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला रोहित पवार यांनी छेद दिला. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार असेल, तर पवार विरुद्ध पवार अशी लढत झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा रोहित पवारांनी केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला कायमचा विरोध असल्याचे कारण त्यांनी दिले. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची शक्यता देखील त्यांनी फेटाळून लावली.
– पवारांच्या घरात उरला नाही एकोपा
याचा अर्थच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच पवारांच्या घरातल्या दोन नेत्यांनी परस्पर विरोधी मते जाहीरपणे व्यक्त करून पवारांच्या कुटुंबात आता पूर्वीचा एकोपा उरला नसल्याचीच चिन्हे दाखविली.
– दबदबा शिल्लक नाही
एरवी शरद पवारांचा त्यांच्या कुटुंबात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड दबदबा शिल्लक राहिला असता, तर बारामतीत आणि इतरत्र पवार विरुद्ध पवार असल्या लढतीचा प्रश्नच उद्भवला नसता. तो विषय देखील चर्चेत आला नसता. मग सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी परस्पर विरोधी वक्तव्ये करणे दूरच राहिले असते.
पण बारामतीत आणि इतरत्र पवार विरुद्ध पवार अशा लढतीचा विषय चर्चेमध्ये आला. त्याला वेगवेगळी तोंडे फुटली. अगदी पवारांच्या घरातल्या नेत्यांनी सुद्धा परस्पर विरोधी मते व्यक्त केली, याचा अर्थच पवारांचा त्यांच्या कुटुंबात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वीसारखा दबदबा शिल्लक राहिला नाही, हे सिद्ध झाले.
त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीतला एक प्रश्नोत्तराचा भाग व्हायरल झाला. त्यामध्ये त्यांनी सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस चालविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले राष्ट्रवादीतले नेते भाजपमध्ये घेणार नसल्याचा शब्द दिला. सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस चालवायला हळूहळू सक्षम होत आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधली अस्वस्थता देखील दूर होत आहे, अशी ग्वाही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
– राष्ट्रवादी चालवायला फडणवीस यांची मदत
देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस चालविण्यासाठी मदत करावीशी वाटणे, राष्ट्रवादी काँग्रेस फोडणार नाही, असा शब्द द्यावा लागणे, यातून सुद्धा पवार नावाच्या ब्रँडचा दबदबा उतरल्याचीच चिन्ह दिसून आली. अन्यथा पवार जर तेवढे सक्षम उरले असते, तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस सोडून धरण्यासाठी मी मदत करतो, अशी म्हणायची वेळ आली नसती किंबहुना पवारांसारख्या सक्षम नेत्याने फडणवीस यांना असे म्हणू सुद्धा दिले नसते. पण पवारांमध्ये राष्ट्रवादी सावरण्याची क्षमता उरली नाही. कारण त्यांच्याकडे सत्ता नाही आणि सत्तेशिवाय पकडीचे राजकारण करण्याची पवारांकडे क्षमता नाही. त्यामुळे त्यांच्याकडे संघर्ष करून सत्ता खेचून आणणारे नेते सुद्धा नाहीत. सत्तेला चिकटून राहायचे असेल, तर देवेंद्र फडणवीस म्हणतील त्याप्रमाणे वागण्याशिवाय पवारांना पर्याय उपलब्ध नाही.
– राष्ट्रवादी काँग्रेस विखरून जाण्याची भीती
त्यामुळेच सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या गटातल्या इतर नेत्यांना बारामती पवार विरुद्ध पवार या लढतीची भीती वाटली. आधीच पवारांचा पक्ष फुटलाय. सगळ्याच पवारांची सत्तेमागे फरफट झाली आहे. अशा स्थितीमध्ये पवारांच्या कुटुंबातली वरवरची का होईना, पण एकजूट तुटलेली दिसली, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बाहेर पडायच्या वाटा मोकळ्या होतील आणि कुणाचाच पायपोस कुणात नसल्याने पवार ब्रँडचे उरले सुरलेले मुसळ सुद्धा केरात जाईल, ही खरी भीती सुप्रिया सुळे आणि पवारांच्या इतर नेत्यांना भेडसावत आहे. पण रोहित पवार त्यात सुद्धा पाचर मारत आहेत. त्याचे मूळ कारण अजित पवारांच्या आणि राजेंद्र पवार यांच्या जुन्या भांडणात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App