नाशिक : बारामती आणि राहुरी; पवारांची दिसली भूमिका दुटप्पी!!, हेच राजकीय चित्र आज महाराष्ट्रातून समोर आले.Sharad Pawar family double standard in by elections
अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे बारामती विधानसभेची आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली एक्झिट मुळे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली. पण यापैकी फक्त बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी ती बिनविरोध व्हावी म्हणून पवार कुटुंबीयांनी धाय मोकलली. शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यापासून ते पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांविषयी कळवळा आणला. अजित पवार बारामतीचे फार लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते त्यांच्यानंतर त्यांच्या राजकीय वारसांना बिनविरोध निवडून देणे हे आपले सगळ्यांचे “कर्तव्य” आहे, अशी भावना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्याच नेत्यांनी व्यक्त केली. त्याला सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी माना डोलावल्या.
– सुरुवात देवेंद्र फडणवीसांकडून
अर्थात याची सुरुवात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करायचे आवाहन केले.
– राहुरी बाबत दुटप्पी भूमिका
पण यापैकी कुणीही राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा शब्द सुद्धा काढला नाही. किंवा तसे आवाहन सुद्धा केले नाही.
वास्तविक राहुरीची जागा भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली एक्झिट नंतर रिक्त झाली. त्यांचाच वारस मुलगा अक्षय कर्डिलेला भाजपने उमेदवारी दिली. बारामतीतील निवडणूक जशी वारसा हक्काने सुनेत्रा पवारांसाठी बिनविरोध व्हावी अशी भूमिका पवार कुटुंबियांनी घेतली तशी भूमिका राहुरी बाबत जाहीरपणे त्यांनी घेतली नाही. भाजपच्या नेत्यांनी सुद्धा आग्रहपूर्वक तशी मांडणी केली नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपच्याच भूमिकेवर स्वतःची भूमिका ठरवली. त्यांच्यापैकी सुद्धा कुठल्याही नेत्याने राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली नाही.
– एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय
या सगळ्या राजकीय घडामोडीतून अजित पवारांना आणि त्यांच्या वारसांना एक न्याय, तर शिवाजीराव कर्डिले आणि त्यांच्या वारसांना दुसरा न्याय हीच दुटप्पी भूमिका समोर दिसली. यात पवार कुटुंबियांनी “आघाडी” घेतली आणि बाकीच्यांनी नुसत्या माना डोलावल्या.
– काँग्रेस कच खाईल का??
एवढे करूनही काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देण्याची कुठलीही गॅरंटी नाही. कारण पवारांना स्वतःचा वारसा हक्क बारामती वर सांगायचा आहे आणि तो काँग्रेसला मान्य नाही म्हणूनच काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवायची दाट शक्यता आहे. शिवाय काँग्रेसने राहुरी मधून उमेदवार दिला, तरी त्या पक्षावर दुटप्पी भूमिका घेतल्याची आंच येणार नाही. पण त्या पक्षाने बारामतीत कच खाल्ली आणि राहुरीत उमेदवार दिला, तर मात्र काँग्रेस पक्ष पवारांच्या इतकाच दुटप्पी असल्यास सिद्ध होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App