वृत्तसंस्था
नवी दिल्ली : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘परीक्षा पे चर्चा’च्या नवव्या आवृत्तीच्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बोर्डाच्या परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, परीक्षेला ओझे मानू नका, तर ती एका उत्सवाप्रमाणे साजरी करा. शिक्षण केवळ गुणांपुरते मर्यादित नसून ते जीवन सुधारण्याचे माध्यम आहे. गुणांच्या शर्यतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधानांनी विचारले की, गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव कोणाला आठवते का? विद्यार्थ्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिल्यावर ते म्हणाले की, यावरून हे स्पष्ट होते की गुण क्षणिक असतात, तर जीवनाची दिशा अधिक महत्त्वाची असते.PM Modi
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची लय ओळखण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची एक पद्धत असते. त्यांनी शिक्षकांनाही आवाहन केले की, त्यांनी विद्यार्थ्यांच्या गतीपेक्षा खूप पुढे जाऊ नये, जेणेकरून अभ्यासाचा दबाव निर्माण होणार नाही. या कार्यक्रमात सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदा ४.५ कोटींवर नोंदणी झाली असून ‘परीक्षा पे चर्चा’ने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. याचा पुढचा भाग ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रसारित होईल.PM Modi
मुलांचे प्रश्न, मोदींचे उत्तर
गुजरातचा विद्यार्थी : शिक्षक अभ्यासाची एक पद्धत सुचवतात तर पालक दुसऱ्या पद्धतीवर जोर देतात?
पंतप्रधान : हे आयुष्यभर चालत राहते. मलाही लोक वेगवेगळे सल्ले देतात. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पद्धतीवर विश्वास ठेवला पाहिजे, सूचना लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेत आणि सुधारणा केवळ स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातूनच केल्या पाहिजेत.
विद्यार्थी सबावत व्यंकटेश : कौशल्य की गुण, यापैकी काय महत्त्वाचे आहे?
पंतप्रधान : संतुलन आवश्यक आहे, मग ते खाणे आणि झोपणे यामध्ये असो, अभ्यास आणि खेळण्यामध्ये असो किंवा कौशल्य आणि गुण यामध्ये. कोणत्याही एका बाजूला जास्त झुकल्याने असंतुलन निर्माण होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App