शरद पवारांनी मनोज जरांगेंचा “पार्थ पवार” केला; राजकीय इंधन वाया गेल्यावर कवडी मोलावर आणला!!

Sharad Pawar targets Manoj Jarange

नाशिक : शरद पवारांनी मनोज जरांगेंचा “पार्थ पवार” केला; राजकीय इंधन वाया गेल्यावर कवडीवर आणला!!, असला प्रकार आज नाशिकमध्ये घडला. शरद पवारांनी ज्याप्रमाणे पार्थ पवार याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे, असे म्हणून हात झटकला होता, त्याच पद्धतीने आज पवारांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. आमच्या त्यांच्या आंदोलनाशी कवडीचाही संबंध नाही. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करायची गरज नाही, असा दावा केला. मनोज जरांगे यांच्या संदर्भात विचारलेला प्रश्न झटकून टाकला. Sharad Pawar targets Manoj Jarange

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एक दिवसाच्या शिबिरासाठी शरद पवार नाशिकला आले आहेत. शिबिर सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी मनोज जरांगे यांचा “पार्थ पवार” करून टाकला. कारण त्यांना तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी संबंध आहे तुमच्याच पक्षाने त्यांना राजकीय इंधन पुरवठा केला आहे असे बोलले जाते. त्यावर तुमचे मत काय??, असा पत्रकारांनी सवाल केला होता. या सवालाची संधी साधत पवारांनी कवडी चलनातून त्याचे उत्तर दिले.

– बाळासाहेबांच्या नातवाला वाचविण्यासाठी

पार्थ पवारला आम्ही कवडीची किंमत देत नाही असे ते सुशांतसिंग राजपूत प्रकरणात म्हणाले होते. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी एवढीच मागणी अर्थ पवारांनी केली होती. पण ती त्यावेळी पवारांना झोंबली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत आले होते. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाला वाचवण्यासाठी पवारांनी आपल्या नातवाची किंमत कवडी पेक्षा कमी करून टाकली होती‌. त्यापाठोपाठ आज मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनात आमच्या कवडीचाही संबंध नाही, असे सांगून त्यांनी हात झटकले.



– जरांगेंच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे इंधन

वास्तविक मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भरपूर राजकीय इंधनपुरवठा केल्याचे लपून राहिले नव्हते. मनोज जरांगे आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांचे राजकीय गुळपीठ सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. जरांगे यांच्या आंदोलनात सामील झालेल्या मराठा युवकांच्या सगळ्या “व्यवस्था” रोहित पवारांनी केल्याचे मराठी माध्यमांमधून उघड दिसले. मनोज जरांगे यांनी केलेल्या आझाद मैदानात केलेल्या आंदोलनात सुप्रिया सुळे जाऊन भेटून आल्या. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी मनोज जरांगे यांना फूस लावणारी वक्तव्ये केली. ती सगळ्या माध्यमांमध्ये छापून आली. त्याचबरोबर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही विविध माध्यमांमधून झाले. ती वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाली. मनोज जरांगे यांचे आझाद मैदानावरचे आंदोलन लवकर संपू नये. ते जास्तीत जास्त चिघळत राहावे यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी छुप्या पद्धतीने भरपूर इंधन पुरवठा केला.

– राष्ट्रवादीचे इंधन गेले वाया

परंतु मनोज जरांगे हे फडणवीस सरकारला लवकर “पटले.” मुंबई हायकोर्टाच्या दबावा पुढे झुकले आणि त्यांनी आंदोलन गुंडाळले. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय इंधन वाया गेले.

या पार्श्वभूमीवर पवारांनी आज नाशिक मधून मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कवडीचाही संबंध नाही, असे सांगून हात झटकले. राष्ट्रवादीचे राजकीय इंधन वाया गेल्यामुळे त्यांनी मनोज जरांगे यांचा “पार्थ पवार” केला.

Sharad Pawar targets Manoj Jarange like he targeted Partha Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात