फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने स्वतःच घेतलेल्या सरकारच्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास झाले. पण काही विभागांची कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्या विभागांना नापासचे गुण मिळाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मधले सर्व विभागांना 100 दिवसांची कामगिरी दिली होती. त्यासाठी त्यांनी तब्बल 902 निकष ठरवले होते. या 902 निकषांच्या आधारे सर्व विभागांची तपासणी करून त्यांना गुण देण्यात आले. त्यामध्ये 12 विभागांनी 100 % गुण मिळविले. यामध्ये गृह, जलसंपदा, ग्रामविकास, बंदरे, पशूसंवर्धन आदी खात्यांचा समावेश राहिला.

उरलेल्या 36 विभागांनी 90% पासून 24% पर्यंत कामगिरी केली. नगर विकास – 2, अन्न नागरी पुरवठा संरक्षण आणि सामान्य प्रशासन सेवा या विभागांची कामगिरी 35 % पेक्षा कमी राहिली.

Devendra Fadnavis government passes exam conducted by itself with 78% marks

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात