तिहार तुरुंग व्यवस्थापनाने सादर केला अहवाल
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृती खालावल्याबद्दल आम आदमी पक्ष सातत्याने दावे करत आहे. ‘आप’ने आरोप केला आहे की, गेल्या काही दिवसांत त्यांचे वजन 8 किलोने कमी झाले असून त्यांची साखरेची पातळीही खूप वाढली आहे.Kejriwal is deliberately losing weight, often returning home-cooked meals
आता तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीबाबत काही खुलासे केले असून ‘आप’चे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. जेल प्रशासनाच्या अहवालानुसार केजरीवाल यांचे वजन साडेआठ किलोनेही कमी झालेले नाही.
2 जून रोजी ते पुन्हा तुरुंगात परतले तेव्हा त्याचे वजन फक्त 2 किलोने कमी झाले होते. ते जाणूनबुजून वजन कमी करत आहेत, अनेकदा तर घरचं जेवणंही त्यांनी परत पाठवलं असल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे.
आम आदमी पार्टीचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी शनिवारी (13 जुलै) सांगितले होते की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांते तुरुंगात सतत वजन कमी होत आहे. अटक झाल्यापासून केजरीवाल यांचे सुमारे 8.5 किलो वजन कमी झाल्याचा दावा त्यांनी केला होता आणि हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, असंही त्यांनी म्हटलं होतं
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App