विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने “डबल M” म्हणजेच मराठा + मुस्लिम कार्ड खेळायचा डाव एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी रचला. त्याला मनोज जरांगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. Manoj jarange ready to play maratha + muslim card in maharashtra with AIMIM
काल छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करण्यासाठी हात पुढे केला. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. समदु;खी लोकांनी एकत्रित यावे. भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी माझ्यासोबत एकत्रित येतील का??, हे मला माहिती नाही. मात्र माझे मत आहे एकत्र आलो तर बदल घडेल. तुम्ही नाही आले तर आम्ही त्यांना पाडायला मोकळे आहोत. मी प्रस्ताव – फ्रस्ताव देण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र सर्वांनी एकत्र यावे असे मला वाटते, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
मनोज जरांगे म्हणाले :
प्रस्तावाचं मला काय कळतंय??, आपण समान दुःख असणारे बांधव आहोत. दलित, मुस्लिम, लिंगायत, धनगर , इतर समाज आपण सगळे समविचारी आहोत. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन दणका द्यायचा आहे. एकत्र यायला समाज कुठेही म्हणला नाही. मला काही नेते माहिती नाहीत. सगळे एकत्र आल्यास सगळ्या समाजाला न्याय मिळेल. नेत्यांना आवाहन करण्यापेक्षा सामान्यांनी एकत्र यावे. आपण सत्ता परिवर्तन करू शकतो. 20 तारखेपर्यंत आम्ही पाहणार आहोत कसं जुळते काय जुळतं ते… फोनची वाट पाहण्यापेक्षा आपलं समाज कसा मोठा होईल, यासाठी एकत्र यायला पाहिजे.
सगळे समाज एकत्र आले तर जातीवाद बंद होईल. स्वतःहून यावं. आपली जात मोठी होईल. एकत्र या कल्याण होईल. निमंत्रण देण्यापेक्षा आपण स्वतःहून एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांना मदत करून मतदान करून जात मोठी करायची आहे.
ओवैसी काय म्हणाले होते?
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करून महाराष्ट्रात “डबल M” अर्थात मराठा + मुस्लिम कार्ड खेळायचा इरादा पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. मनोज जरांगे यांचा प्रस्ताव आला. तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करेन. मनोज जरांगे यांच्यामुळे पंकजा मुंडे बीड लोकसभा निवडणुकीत पडल्या. त्यांना विजय मिळता आला नाही. मग मुस्लिम उमेदवार का जिंकत नाहीत?? महाराष्ट्र 11 टक्के मुस्लिमसाठी दुःख आहे. त्यांच्याकडून बोलणं होत असेल तर नक्की बोलू, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते.
आज मनोज जरांगे यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या सूरात सूर मिसळून महाराष्ट्रात “डबल M” अर्थात मराठा + मुस्लिम कार्ड खेळायचा डाव रचायला सकारात्मक प्रतिसाद दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App