विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक आजच्या मतदानाच्या दिवशी शहर काझींनी 7 निकाह रद्द केले. मुस्लिमांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आणि त्यांना मतदानाचा टक्का वाढवायला सांगितले. या पार्श्वभूमीवर शहरातील वेगवेगळ्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय निवासी सोसायट्यांच्या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा आपला टक्का वाढविला. nashik city median man voting
इंदिरानगर, राजीव नगर, चेतना नगर, पाथर्डी, शिव कॉलनी श्रद्धा विहार, दिपाली नगर या परिसरातल्या नागरिकांनी तसेच गंगापूर रोड, पाईपलाईन रोड, कॉलेज रोड, सावरकर नगर आदी परिसरांमध्ये नागरिकांमध्ये मतदानाची चेतना जागृत झाली आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर येऊन मतदानाचा टक्का वाढविला.
मुंबईमध्ये तब्बल 37 मशिदींमधून व्होट जिहादचे आवाहन करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये देखील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न चालवला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App