विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी या दोन स्वतंत्र संघटना आहेत. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केल्याचे नॅरेटिव्ह सध्या वेगवेगळ्या मधून पसरवण्यात येत आहे. परंतु, प्रत्यक्षात जे. पी. नड्डा यांनी संघ आणि भाजप यांची विचारप्रणाली “राष्ट्र सर्वप्रथम” हीच असून कार्यक्षेत्रे वेगवेगळी असल्याचे नमूद केले आहे. RSS and BJP works on same line Nation First, but in different fields, asserts J. P. Nadda
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जे. पी. नड्डा यांनी संघ आणि भाजप यांच्या विषयी प्रसार माध्यमे कशा पद्धतीने गैरसमज पसरवतात याचे सविस्तर वर्णन केले, त्याच वेळी संघ आणि भाजप यांची विचारप्रणाली “राष्ट्र सर्वप्रथम” यावर आधारित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जे. पी. नड्डा म्हणाले :
संघ एक विचार प्रणालीवर आधारित काम करत असलेली संघटना आहे. संघ आपल्या पद्धतीने काम करतो. भाजप आपल्या पद्धतीने काम करतो. दोन्हींची कार्यक्षेत्र वेगवेगळी आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याचा संघाकडे एका शतकाचा अनुभव आहे. देशातल्या सर्व भागांमध्ये संघाचे हे काम अखंडपणे सुरू आहे. भाजपकडून 140 कोटी जनतेची सेवेची अपेक्षा आहे.
प्रश्न संघाची भाजपला गरज आहे किंवा नाही हा नाहीच, कारण दोन्ही संघटनांची कार्यक्षेत्रे वेगळी असली तरी “राष्ट्र सर्वप्रथम” याच तत्वप्रणालीने दोन्ही संघटना काम करतात.
संघ आणि भाजप यांच्या संबंधांविषयी वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्ये कितीही गैरसमज पसरवले, तरी प्रत्यक्षात दोन्ही संघटनांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविषयी आदराची भावना आहे आणि सहयोगाने काम करण्याची त्यांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App