काँग्रेस का हाथ गुनाहों के साथ; पेपर लीक से लेकर खनन घोटाले की बात!!

विशेष प्रतिनिधी

जयपूर : काँग्रेस का हाथ गुनाहों के साथ; पेपर लीक से लेकर खनन घोटाले की बात!!, राजस्थान विधानसभा निवडणुका रंगात आली असताना सर्व राजकीय पक्षांनी आपली ताकद त्यात पणाला लावली आहे, पण सत्ताधारी काँग्रेसला हरवण्यासाठी भाजप वेगवेगळे फंडे वापरून अशोक गेहलोत सरकारला हैराण करत आहे. Congress’s hand in crimes paper leaks in rajasthan

काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हाताचा पंजा हा राक्षसी किंवा खुनी पंजा आहे असे दाखवून राजस्थानात काँग्रेसच्या राजवटीत गुन्हेगारांना कसे मोकाट रान मिळाले आहे, हे त्या हाताच्या पंजावर रेखाटून भाजपच्या प्रचारात व्हायरल करण्यात आले आहे.

पेपर लीक पासून लव्ह जिहाद, खनन घोटाळा ते लाल डायरीपर्यंत अशोक गेहलोत सरकारचे हात भ्रष्टाचारात आणि गुन्ह्यांमध्ये बरबटले आहेत. महागाई आणि बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरच्या उत्पादन शुल्कामध्ये कितीही कपात केली, तरी त्याचा लाभ राजस्थानच्या सरकार जनतेला मिळू शकला नाही. कारण अशोक गेहलोत सरकारने त्यावरचा राज्य सरकारचा कर कमीच केला नाही. त्यामुळे राजस्थानातली महागाई इतर राज्यांपेक्षा वाढतीच राहिली. याचा दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागला आणि त्याचवेळी राजस्थान सरकारचे वेगवेगळे मंत्री खनन घोटाळ्यापासून पेपर लीक पर्यंत वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये अडकले.

राजस्थान लव्ह जिहाद सारख्या घटनांवर पांघरूण घातले गेले, इतकेच नाहीतर धर्मांत मुस्लिमांनी भरदिवसा हिंदूंचे गळे चिरण्याच्या घटना घडल्या तरी देखील अशोक गेहलोत सरकार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्याकांचे तुष्टीकरणच करत राहिले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशोक गेहलोत सरकारचे पुरते वाभाडे काढले. धर्मांधानी उत्तर प्रदेशात असे हिंदूंचे गळे चिरले असते तर त्यांचा तिथल्या तिथे “न्याय” केला असता पण राजस्थानातले नपुंसक सरकार ते करू शकले नाही, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी अशोक गेहलोत सरकारचा विद्रूप चेहरा जनतेसमोर उघडा पाडला.

राजस्थानातले काँग्रेसचे सरकार कोणकोणत्या वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये अडकले आहे??, कोण कोणते गुन्हे अशोक गेहलोतांच्या राजवटीत राजस्थानात राजरोसपणे सुरू आहेत, हे भाजपने हाताच्या पंजावर रेखाटून ते चित्र निवडणूक प्रचारात व्हायरल केले आहे.

Congress’s hand in crimes paper leaks in rajasthan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात