राहुल गांधींची कुत्री, तिचे नाव नूरी; एमआयएम मुळे करावी लागणार आता कोर्टाची वारी!!

वृत्तसंस्था

प्रयागराज : राहुल गांधींची कुत्री, तिचे नाव नुरी; काँग्रेस गेली डब्यात, तरी हौस होई ना पुरी!!, असे आधी म्हटले गेले. पण आता त्यामध्ये बदल करून राहुल गांधींची कुत्री, तिचे नाव नूरी; एमआयएम मुळे करावी लागणार आता कोर्टाची वारी!!, असे म्हणायची वेळ आली आहे.AIMIM leader stretch rahul gandhi to court for naming his dogee noorie, as it’s an insult to muslim girls

कारण राहुल गांधींनी आपल्या कुत्रीचे नाव नूरी ठेवणे हा मुस्लिम मुलींचा अपमान आहे, असे सांगून उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज मधील एका मुस्लिम नेत्याने चक्क कोर्टात धाव घेतली आहे. राहुल गांधींनी कुत्रीचे नाव बदलावे, अशी मागणी मोहम्मद फरहान यांनी केली आहे.



नूरी या शब्दाचा उल्लेख कुरान शरीफ मध्ये आहे. त्यामुळे राहुल गांधींनी मुस्लिम समाजाची माफी मागावी आणि आपल्या कुत्रीचे नाव बदलून टाकावे, अशी मागणी मोहम्मद फरहान यांनी केली. मोहम्मद फरहान यांच्या अर्जावर प्रयागराज कोर्टामध्ये 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार असून त्या दिवशी फरहान यांचा जबाब होईल आणि कदाचित प्रयागराज कोर्ट राहुल गांधींना समन्सही बजावू शकेल, असे सांगण्यात येत आहे.

पण एकूण राहुल गांधींचे कुत्रा प्रेम त्यांच्यासाठी आणि काँग्रेससाठी नेहमीच अडचणीचे ठरले आहे. कुत्र्याला बिस्किट खाऊ घालण्याच्या नादात राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी आसाम मधले दिग्गज नेते हेमंत विश्वशर्मा यांना गमावले. आज हेमंत विश्वशर्मा आसामचे मुख्यमंत्री आहेत, पण ते भाजपचे मुख्यमंत्री ठरले आहेत. हेमंत विश्वशर्मांनी मोठ्या कष्टाने आसाम मध्ये काँग्रेस वाढविली. तिथल्या पक्षाच्या तक्रारी सांगण्यासाठी ते राहुल गांधींना दिल्लीत भेटले, पण राहुल गांधींनी त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेण्याऐवजी आपल्या आवडत्या कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालणे पसंत केले. याचा राग येऊन हेमंत विश्वशर्मांनी काँग्रेस सोडली आणि काँग्रेस आसाम मध्ये पराभूत करून दाखवली. त्यानंतर आता नूरी कुत्रीचा एपिसोड घडतो आहे.

याची मूळ कथा अशी :

राहुल गांधी ज्यावेळी गोव्याच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी एका कुटुंबातली कुत्र्यांची जोडी त्यांना खूप आवडली. त्यापैकीच एका कुत्रीचे नाव त्यांनी नूरी ठेवले आणि तिला त्या कुटुंबाने गोव्यातून विमान प्रवास करून दिल्लीत आणली. ॲनिमल डे निमित्त ती सोनिया आणि राहुल गांधी यांच्या 10 जनपथ निवासस्थानी दाखल झाली. या संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आणि तो व्हायरल झाला.

पण राहुल गांधी आणि कुत्री यांचे राजकीय नातेही वेगळेच राहिले आहे.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे :

आसामचे सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळचे काँग्रेस नेते हेमंत विश्वशर्मा आसाम मधल्या काही राजकीय घडामोडींची चर्चा करण्यासाठी सोनिया आणि राहुल गांधींच्या निवासस्थानी म्हणजे 10 जनपथलाच गेले होते. तेथे राहुल गांधीने त्यांना वेळ जरूर दिली, पण हेमंत विश्वशर्मा यांनी बोलायला सुरुवात करताच राहुल गांधींनी आपल्या कुत्र्याला जवळ बोलावले आणि त्याला बिस्किटे खाऊ घालू लागले. हेमंत विश्वशर्मा यांच्या बोलण्याकडे राहुल गांधींनी लक्षच दिले नाही.

काही मिनिटे गेल्यानंतर हेमंत विश्वशर्मा वैतागले आणि तिथून ते बाहेर पडले त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आणि हेमंत विश्व शर्मांनी काँग्रेस सोडली. त्यानंतर हेमंत विश्वशर्मांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते मुख्यमंत्री सर्वानंद सोनवल यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून 5 वर्षे राहिले आणि आज ते आसामच्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री आहेत.

राहुल गांधींनी कुत्र्याला बिस्किट खाऊ घालण्याचा हौसेपोटी आसाम काँग्रेसचा दिग्गज नेता पक्षातून गमावला. आसाम मधली काँग्रेसची सत्ताही त्या पाठोपाठ गेली. ती पुढच्या निवडणुकीतही परत आली नाही. पण तरी देखील राहुल गांधी सुधारले नाहीत. आपले प्राणी प्रेम दाखविण्यासाठी त्यांनी नूरी कुत्रीचा व्हिडिओ शेअर केलाच.

कुत्रीचे नाव ठेवताना देखील त्यांनी “नूरी” ठेवले. यात देखील राहुल गांधींची “विशिष्ट मानसिकता” दिसलीच. या मानसिकतेवरच मोहम्मद फरहान यांनी बोट ठेवत राहुल गांधींना कोर्टात खेचले आहे.

AIMIM leader stretch rahul gandhi to court for naming his dogee noorie, as it’s an insult to muslim girls

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात