विशेष प्रतिनिधी
मुंबई : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी शाळेच्या कँटीनमध्ये आणि शाळा परिसरात वडापाव विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयामुळे वडापावप्रेमी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एका चिमुकल्या विद्यार्थ्याने थेट मुंढे काकांकडे वडापाव पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. या विद्यार्थ्याला मुंढे यांनी स्मितहास्य करत पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावून सांगितले. या दोघांच्या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विद्यार्थ्याची थेट मुंढे काकांकडे मागणी
शाळेतील वडापाव विक्री बंद झाल्याने नाराज असलेल्या या विद्यार्थ्याने आपली मागणी थेट तुकाराम मुंढे यांच्यासमोर मांडली. शाळेत वडापाव विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, वडापाव विक्री पुन्हा सुरू व्हावी, असे मला आणि माझ्या मित्रांना वाटते. याबाबत तुमचे काय म्हणणे आहे, असा सवाल विद्यार्थ्याने मुंढे यांना केला.
विद्यार्थ्याचा हा प्रश्न ऐकल्यानंतर मुंढे स्मितहास्य करताना दिसतात. विद्यार्थ्याची मागणी ऐकून घेत त्यांनी मुलांनी केवळ आवडत्या स्नॅक्सपुरता विचार न करता आपल्या आरोग्याचाही विचार केला पाहिजे, असे समजावून सांगितले.
View this post on Instagram A post shared by Indraneil Anaspure (@indraneilmanaspure)
A post shared by Indraneil Anaspure (@indraneilmanaspure)
तळलेले पदार्थ टाळण्याचा सल्ला
वडापावसारखे तळलेले पदार्थ चवीला आवडत असले, तरी त्यांचे वारंवार सेवन करण्याऐवजी पौष्टिक आणि संतुलित आहाराला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असा संदेश मुंढे यांनी या संवादातून दिला. विद्यार्थ्यांच्या आहाराच्या सवयी सुधाराव्यात आणि लहान वयापासूनच आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यावर त्यांनी भर दिला.
संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
वडापाव पुन्हा सुरू करण्याची विद्यार्थ्याची निरागस मागणी आणि त्यावर तुकाराम मुंढे यांनी दिलेले हसतमुख उत्तर यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीचा विचार करतानाच त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे, हा संदेश या संवादातून समोर येत आहे.
As soon as the school’s vada-pav stall closed, the student rushed straight to ‘Mundhe Kaka’; upon hearing the reply, even you will say…
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App