वृत्तसंस्था
मोरबी : गुजरात मधील मोरबी येथे पूल दुर्घटनेत मृतांची संख्या 135 झाली आहे आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोबीच्या दुर्घटनाग्रस्त पुलाजवळ पाहून जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तेथे अजूनही मृतदेहांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफच्या टीम तिथे कार्यरत आहेत. Prime Minister Narendra Modi inspects the collapsed bridge at Morbi in Gujarat
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष सिंघवी यांच्यासह घटनास्थळावर जाऊन पाहणी केली आहे. पंतप्रधान मोदींचा मोरबी दौरा केवळ इव्हेंट असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. मोदी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देणार आणि हॉस्पिटलला भेट देणार हे लक्षात घेऊन तेथे गुजरात सरकारने डागडुजी केली आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. हॉस्पिटलमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था केल्या. या डागडुजीचे काम आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने प्रत्यक्ष तिथे जाऊन बंद पाडले.
गुजरात: प्रधानमंत्री मोदी मोरबी में दुर्घटनास्थल पर पहुंचे जहां खोज और बचाव अभियान जारी है। 30 अक्टूबर को यहां मोरबी ब्रिज गिरने की घटना हुई थी, हादसे में मरने वालों की वर्तमान संख्या 135 है।#MorbiBridgeTragedy pic.twitter.com/PHbeWCutoM — ANI_HindiNews (@AHindinews) November 1, 2022
गुजरात: प्रधानमंत्री मोदी मोरबी में दुर्घटनास्थल पर पहुंचे जहां खोज और बचाव अभियान जारी है।
30 अक्टूबर को यहां मोरबी ब्रिज गिरने की घटना हुई थी, हादसे में मरने वालों की वर्तमान संख्या 135 है।#MorbiBridgeTragedy pic.twitter.com/PHbeWCutoM
— ANI_HindiNews (@AHindinews) November 1, 2022
मोरबीच्या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या 9 लोकांना गुजरात पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र, यामध्ये ओरेवा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वगळले असून केवळ क्लार्क आणि प्रत्यक्ष तिथे काम करणाऱ्या लोकांनाच अटक केल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींचा प्रत्यक्ष घटनास्थळाचा आणि हॉस्पिटलचा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App