विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं मूळ आडनाव ठाकूर होते. रमेश देव यांचे वडील राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात न्यायलयीन कामाकाजात मदत करीत असत. तेव्हा रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना मदत केलेली.He is the real Ramesh Thakur, but Shahu Maharaj called his father God, so Ramesh became God
तेव्हा शाहू महाराज हे रमेश देव यांच्या वडिलांना उद्देशून म्हणाले होते, की तुम्ही ठाकूर नाही, तर देव आहात. तेव्हापासून ठाकूर हे आडनाव जाऊन सगळेजण त्यांना देव या आडनावानेच संबोधू लागले होते.
रमेश देव यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. मुळचे राजस्थानातील जोधपूरजवळील ठाकूर घराण्यातील असलेल्या रमेश देव यांचा जन्म कोल्हापुरात झाला होता. त्यांनी एक काळ मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवली . फक्त मराठी सिनेमा किंवा हिंदी सिनेमाच नव्हे, तर छोट्या पडद्यावरती देखील रमेश देव यांनी आपला ठसा उमटवला होता.
मराठीमध्ये नायकाच्या भूमिकेत रसिक प्रेक्षकांना भावलेले रमेश देव हे हिंदीत खलनायकाच्या भूमिकेतही तितक अभिनय करताना दिसले होते. आपल्या वर्सटाईल अभिनयानं त्यांनी अनेकांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं.
रमेश देव यांनी 1962 मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीमा देव) यांच्यासोबत लग्न केलं होतं. या दोघांनीही अनेक चित्रपटांत सोबत काम केले. देव यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1950 मध्ये मराठी चित्रपटापासून केली. पुढे त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले. त्यांनी सुरुवातीला छोटे छोटे भूमिका साकारल्या.
पुढे रमेश देव यांना चित्रपटात मुख्य भूमिका मिळत गेल्या. हिंदी चित्रपटांत त्यांनी सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. याच वेळी दुसरीकडे सिनेसृष्टीत नलिनी सराफ हे नाव नावारुपाला येत होते. त्यांनी चित्रपटांसाठी आपले नाव सीमा असे ठेवले होते. सीमा देव यांनी 1960 मध्ये जगाच्या पाठीवर या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं.
याच चित्रपटात रमेश देव यांनीही भूमिका साकारली होती. या जोडीमुळे जागाच्या पाठीवर हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यावेळी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. 1962 मध्ये त्यांनी वरदक्षिणा या चित्रपटात सोबत काम केले.
या चित्रपटावेळीच दोघांचे प्रेम जुळले. नंतर उशीर न करता त्यांनी त्याच वर्षी लग्न केलं. 2013 मध्ये या जोडीच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाले, यावेळीदेखील दोघांमधील प्रेम तेवढेच फुललेले दिसले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App