मुख्यमंत्री फेडरेशन वगैरे ठीक, पण नेतृत्व कोण करणार? आणि ५६ आमदारांच्या मुख्यमंत्र्यांचे कोण ऐकणार??


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात आत्तापर्यंत पाऊल टाकण्याच्या अनेक वेळा गोष्टी केल्या आहेत. पण आता ते एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहेत. देशभरातल्या बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे एक फेडरेशन स्थापन करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करणार आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात स्पष्ट माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांना भेटणार आहेत आणि त्यांच्याबरोबर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांना एकत्र कसे आणता येईल?, त्यांचे एक फेडरेशन बनवून भाजप कशी टक्कर घेता येईल?, यासाठी विचार विनिमय करणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.Chief ministers federation of non BJP states; though Idea is good, but who Will be the leader??

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांचे फेडरेशन बनवण्याचे एक पाऊल पडताच देशाच्या पूर्वेकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा उचल घेत
देशातल्या सर्व बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भाजप विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. म्हणजे पश्चिमेकडून उद्धव ठाकरे आणि पूर्वेकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे दोघे महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री दिल्लीत गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून एकदम उडी मारून पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर “सुलतानढवा” करणार आहेत. ही “आयडियेची कल्पना” कितीही भारी वाटली तरी बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांच्या फेडरेशनमध्ये (जे अजून स्थापनच व्हायचे आहे) त्याचे नेतृत्व कोण करणार??, हा खरा प्रश्न उद्भवला आहे.

बिगर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आपापल्या राज्यांमध्ये अतिशय बळकट आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर स्वतः ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल मध्ये बळकट आहेत. तामिळनाडूत एम. के. स्टालिन बळकट आहेत. तेलंगणमध्ये केसीआर चंद्रशेखर राव बळकट आहेत. आंध्रप्रदेशात वायएसआर जगन मोहन रेड्डी बळकट आहेत. राहता राहिले ओरिसात नवीन पटनाईक बळकट आहेत. बाकीच्या राज्यांमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. ते या मुख्यमंत्र्यांच्या फेडरेशन मध्ये सहभागी होणार का? किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना फेडरेशन मध्ये सहभागी करून घेणार का? हदेखील प्रश्‍न आहे.

शिवाय बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे एक सूत्रबद्ध वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे वर उल्लेख केलेले सर्व मुख्यमंत्री आपापल्या राज्यात स्वबळावर प्रचंड बहुमत मिळवून सत्तेवर आलेले बळकट मुख्यमंत्री आहेत. हे सर्व मुख्यमंत्री महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या 56 आमदारांच्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व का स्वीकारतील? किंवा त्यांच्या आवाहनाला तरी का प्रतिसाद देतील? हा मूलभूत प्रश्न आहे…!!

शिवाय ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे जसे भाजपचे विरोधक आहेत तसेच ते अन्य कोणत्याही विरोधी पक्षांना फारसे कधी जवळ करताना दिसले नाहीत किंबहूना ओरिसा पुरते त्यांचे “एकला चलो रे” हे राज्य ते सांभाळून केंद्र सरकारची जुळवून घेताना दिसत आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कितीही बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांची एकजूट करावीशी वाटली तरी इतर राज्यांचे स्वबळावर बहुमत मिळवून सत्तेवर आलेले मुख्यमंत्री त्यांचे कितपत ऐकतील? आणि त्यांनी का ऐकावे? हाही प्रश्न आहे.

दक्षिणेतल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे एक वैशिष्ट्य राहिले आहे, ते फारसा कधी केंद्र सरकारशी राजकीय पंगा घेताना दिसत नाहीत. उलट केंद्रातून आपल्या राज्यांना भरघोस निधी मिळावा यासाठी केंद्र सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे अथवा आघाडीचे असले तरी त्याच्याशी जुळवून घेताना दक्षिणेतल्या राज्यांचे मुख्यमंत्री दिसले आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातच सत्ता डळमळीत असताना त्यांच्या मुख्यमंत्री फेडरेशन बनवण्याच्या आवाहनाला प्रतिसाद कोण देणार?, हाही कळीचा प्रश्न आहे आणि हे सर्व बिगर शासित भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री एकत्र आले तरी त्यांचे नेतृत्व कोण करणार? त्या नेतृत्वामध्ये ज्येष्ठता हा निकष असणार का? आणि ज्येष्ठता हा निकष असेल तर सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री म्हणून २० वर्षांच्या आसपास काळ उपभोगलेले नवीन पटनाईक यांचे नेतृत्व इतर “ज्युनियर” मुख्यमंत्री स्वीकारतील का?, हा ही तितकाच कळीचा प्रश्न आहे.

अशा स्थितीत महाराष्ट्रातले आपले डळमळीत झालेले आसन बळकट करण्यासाठी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात मुख्यमंत्र्यांचे फेडरेशन बनवण्याचा बनविण्याची राजकीय मशक्कत तर करत नाहीत ना?, अशीही शंका डोकावून जात आहे.

परंतु, काही तरी झाले तरी आपापल्या राज्यात स्वबळावर प्रचंड बहुमत मिळवून सत्तेवर आलेले बिगर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री हे 56 आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व का स्वीकारतील?, हा सर्वाधिक कळीचा प्रश्न आहे…!!

Chief ministers federation of non BJP states; though Idea is good, but who Will be the leader??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात