पाटील म्हणाले की , मुख्यमंत्री कार्यरत झाले आहेत. त्यांनी काम सुरू केले असून ते झूमवरून आमच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित होते.Chandrakant Patil should pay attention to the leak in Uttar Pradesh, says Jayant Patil
विशेष प्रतिनिधी
मुंबई : चंद्रकांत पाटील वारंवार म्हणायचे की मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कारभार दुसर कोणाकडे तरी द्यायला हवा.ते काम व्यवस्थित करू शकत नाहीत. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले की , मुख्यमंत्री कार्यरत झाले आहेत. त्यांनी काम सुरू केले
असून ते झूमवरून आमच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित होते.त्यामुळे त्यांचे काम कुठे अडले आहे, असं मला वाटत नाही. ते व्यवस्थित काम करत आहेत, असे प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की , शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर देशातील वातावरण झपाट्याने बदलत आहे.लोकं पर्याय शोधत असून भाजपाला सोडून मतदार दुसऱ्या बाजूला झुकलेला आहे.अनेक ठिकाणी कॉंग्रेसचा पर्याय निवडताना दिसत आहे,
तर काही ठिकाणी सपाचा पर्याय निवडत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशात तर मंत्रीमंडळातले मंत्री आणि काही आमदार पक्ष सोडून चाललेले आहेत. याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगाविला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App