स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज कॉर्पोरेशन अर्थात स्पेसएक्स म्हणून व्यापार करणारी ही एक खाजगी अमेरिकन अंतराळ सामग्री निर्माता आणि अंतराळ वाहतूक सेवा कंपनी आहे. एलोन मस्क यांनी ६ मे २००२ मध्ये मंगळ मोहीम सक्षम करण्यासाठी तसच अंतराळ वाहतूक खर्च कमी करण्याच्या उद्दीष्टाने याची स्थापना केली.What exactly is SpaceX?
स्पेसएक्सने आजवर अनेक प्रक्षेपण वाहने आणि ड्रॅगन सारखे अंतराळ यान विकसित केले आहे. स्पेसएक्सच्या स्थापनेची कल्पना संस्थापक एलोन मस्क यांनी २००१ साली मंगळावर ग्रीन हाऊस आणि झाडं लावण्याची कल्पना मांडली होती.
अंतराळ क्षेत्रात लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि नासाचे बजेट वाढवणे अशी दोन उद्दिष्ट त्यामागे होती. सुरवातीला रशियाकडून कमी किंमतीत रॉकेट खरेदी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्याला यश मिळालं नाही. त्यामुळे स्वतःच कमी किमतीत रॉकेट निर्मिती करायची हा विचार त्यांनी केला. सोफ्टवेअर, हार्डवेअर, एकूण लागणार रॉ मटेरियल या सगळ्याचा हिशोब करुन या प्रवासाला सुरुवात झाली.
पहिल्या पासूनच साधारण सत्तर टक्क्यांपर्यंतचा फायदा प्राप्त करत कंपनीची यशस्वी वाटचाल चालू झाली. मस्क यांनी रॉकेट अभियंते टॉम मूलर यांच्या साथीने एका गोदामसदृश जागेत सुरू केली स्पेसएक्स. २००५ साली १६० कर्मचारी सोबत घेऊन काम करणारी ही कंपनी आज घडीला अंदाजे ८००० कर्मचारी बरोबर घेऊन यशाची शिखरे गाठत आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ काँग्रेस च्या झालेल्या एका कार्यक्रमात एलोन मस्क यांनी अमेरीका सरकार अंतराळ क्षेत्राकडे भविष्यातील एक शस्त्र म्हणून पाहत आहे, असा उल्लेख केला होता. मे २०२० मध्ये या कंपनीचे मुल्यांकन अंदाजे ३६ अब्ज डॉलर पर्यंत होते. स्पेसएक्स ही अंतराळ क्षेत्रातील जगातील पहिली खाजगी कंपनी आहे जीच्याकडे अनेक प्रकल्पाचं श्रेय जाते.
त्यांनी 2008 साली सर्वप्रथम खाजगी अनुदानित लिक्विड-प्रोपेलेंट रॉकेट यशस्वी रित्या अवकाशात सोडले. 2010 साली ड्रॅगन हे स्पेसक्राफ्ट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे 2012 साली यशस्वीरित्या अवकाशयान पाठवणारी ही पहिली खाजगी कंपनी ठरली. 2020 मध्ये अगदी अलीकडेच नासाचे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांवर यशस्वीरित्या पाठवणारी पहिली खाजगी कंपनी ठरली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App