मुंबई : अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगली राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या आशीवार्दाने झाल्या आहेत. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीच्या सूत्रधारांना जेरबंद करण्याऐवजी भाजपा तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खटले दाखल केले जात आहेत.Revenge cases against pro-Hindu activists, stop implicating BJP workers under false charges, demands Madhav Bhandari
प्रशासनाने भाजपा कार्यकत्यार्ना खोट्या गुन्ह्याखाली अडकवणे थांबवावे, असा इशारा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिला आहे.राज्यात नुकत्याच झालेल्या धार्मिक दंगली संदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना भांडारी म्हणाले,
12 नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोर्चे काढण्यासाठी कोणत्या संघटनांनी स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागितली असल्यास, त्याबाबतची कागदपत्रे सरकारने जनतेपुढे ठेवावी, या मोर्चांमध्ये किती संह्ययेने लोक सहभागी होतील, याची माहिती प्रशासनाकडे आली असेल तर, तीही प्रसिद्ध करावी तसेच अमरावतीत अटक केलेल्या सर्वांची नावे आणि त्यांचे राष्ट्रीयत्व जाहीर करा.
मालेगाव येथे दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक झाली का, याची माहिती सरकारने जाहीर करावी. नांदेड येथे अटक केलेला एक दंगलखोर पोलिसांच्या तावडीतून पळाला आहे. अजूनही पोलिस त्याला पकडू शकले नाहीत.
अमरावती येथे इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे 19 तारखेला होणाऱ्या सीईटी व अन्य परीक्षांचे फॉर्म भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद असल्याबद्दल आरडाओरडा करणारे महाराष्ट्रातील विचारवंत, बुद्धीमंत, पत्रकार अमरावतीतील नेट सेवा बंद असल्याबाबत मौन का पाळत आहेत असा सवाल भांडारी यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App