प्रस्तावित आमदारांची यादी मंजूर होऊ नये ही शरद पवारांचीच योजना? माधव भांडारी यांचा संशय


प्रस्तावित आमदारांची यादी मंजूर होऊ नये ही शरद पवारांचीच योजना असू शकते. शरद पवार यांचं राजकारण खुद्द पवार सोडून बाकी कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे आमदारांची ही यादी मंजूर होऊ नये, अशी योजना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही असू शकते, असा संशय भारतीय जनता पक्षाचे नेते माधव भांडारी यांनी व्यक्त केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रस्तावित आमदारांची यादी मंजूर होऊ नये ही शरद पवारांचीच योजना असू शकते. शरद पवार यांचं राजकारण खुद्द पवार सोडून बाकी कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे आमदारांची ही यादी मंजूर होऊ नये, अशी योजना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही असू शकते, असा संशय भारतीय जनता पक्षाचे नेते माधव भांडारी यांनी व्यक्त केला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या प्रस्तावित नावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नकार दिला जाणार असल्याचा असा आरोप केला आहे.

मुश्रीफांचा दावा म्हणजे गावगप्पा आहेत, असं म्हणत भांडारी यांनी आरोपांची खिल्ली उडवली आहे. भांडारी म्हणाले, हसन मुश्रीफांचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे. त्यांच्या या गावगप्पा आहेत. ग्रामविकास मंत्रीपदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने असं बोलू नये. मात्र, जे काम आपल्याला झेपत नाही त्याबद्दल अपप्रचार करण्याची राष्ट्रवादीची पद्धतच आहे

मुश्रीफ म्हणाले होते की, कोल्हापूर जिल्ह्याचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या मातोश्री यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यांचे सांत्वन करण्यासाठी भय्यासाहेब माने, जिल्हा बँकेचे युवराज पाटील गेले होते. सांत्वन केल्याच्या काही मिनिटांतच चंद्रकांत पाटलांचं तिथं आगमन झालं. विनय कोरे आणि चंद्रकांत पाटलांची सांत्वनपर चर्चा झाली. त्यावेळी विधान परिषदेची यादी राज्यपालांकडे जाणार असल्याच्या बातमीचा विषय निघाला.

त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं आहे, असं कोरेंना सांगितले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था