बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील  बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे असल्याने हे पाऊल उचलले आहे.Concrete measures need to be taken to prevent child marriage; State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar sent a letter to the Chief Minister


विशेष प्रतिनिधी

पुणे : अलीकडच्या काळात राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे. बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील  बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे असल्याने हे पाऊल उचलले आहे.

यावेळी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचं निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजेच सरपंच असो , तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी ग्रामसेवक, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करावी. त्यानंतर अश्या प्रकारची घटना घडली व त्यांचे दोष सिद्ध झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावं.



दरम्यान ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये करावी. बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचं पद रद्द करण्यात यावे अशी शिफारस राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून करत असल्याचे पत्र रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

Concrete measures need to be taken to prevent child marriage; State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar sent a letter to the Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात