सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रीडाप्रेमींनी त्याच्या डान्स स्टेपचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.Virat Kohli’s abandoned dance to the song ‘My Name Is Lakhan’; Video viral
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत – अफगाणिस्तान सामना झाला.या सामन्यादरम्यानचा विराट कोहलीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकदा मैदानावर डान्स करताना भारतीय कर्णधार विराट कोहली दिसला आहे.
अफगाणिस्तान भारत सामन्यादरम्यान अनिल कपूरच्या ‘माय नेम इज लखन’वर विराट कोहली डान्स करताना दिसला. सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रीडाप्रेमींनी त्याच्या डान्स स्टेपचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Dance of Virat in " My name is Lakhan " song 😍❤Love to see our cheeku in happy mood 🥰 pic.twitter.com/vgBIq927h2 — 𝚃𝙰𝚁𝚄𝙻𝙰𝚃𝙰 𝚂𝙰𝚁𝙺𝙰𝚁 (@Taru_10_18) November 4, 2021
Dance of Virat in " My name is Lakhan " song 😍❤Love to see our cheeku in happy mood 🥰 pic.twitter.com/vgBIq927h2
— 𝚃𝙰𝚁𝚄𝙻𝙰𝚃𝙰 𝚂𝙰𝚁𝙺𝙰𝚁 (@Taru_10_18) November 4, 2021
अफगाणिस्तानच्या फलंदाजीवेळी विराट कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी जात होता. तेव्हा ‘माय नेम इज लखन’ हे गाणे लागले होते. विराट कोहली हे गाणे ऐकताच स्वत:ला आवरू शकला नाही आणि तो तिथेच नाचू लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विराट कोहली यापूर्वी २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान डान्स करताना दिसला होता. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हाच अंदाज दिसला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App