विशेष प्रतिनिधी
लखनऊ: महिलांमधील लसीकरणा संदर्भात गैरसमज आणि संकोच दूर करून कोरोनावर मात करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने विशेष मोहिम आखली आहे .त्याअंतर्गत मिशन जून अंतर्गत लसीकरणासाठी 150 विशेष महिला बूथ सुरू केले आहेत. पुरुषांच्या तुलनेत लस घेण्याबाबत स्त्रियांमध्ये जास्त संकोच असल्याचे दिसून आल्यानंतर हे पाऊल उचलले गेले. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन महिला विशेष बूथ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Uttar Pradesh: Important step of Yogi government: 150 special women’s booths to remove misconceptions and hesitations about vaccination among women!
अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री योगी यांनी महिलांना सशक्त बणवण्यासाठी ही योजना आखली आहे .बहुतांशी कुटुंबात महिलांनी लसीकरण केलेले नाही त्या या बाबतीत उदासीन दिसून आल्या .
लसीकरणानंतर आजारी पडण्याच्या भितीने अनेक महिलांनी लसीकरण केलेच नसल्याचे उघड झाल्यानंतर योगी सरकारने महिलांसाठी हे विशेष बुथ तयार केले .
आतापर्यंत 92,44,765 पुरुष आणि 69,30,245 महिलांनी लस घेतली आहे .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App