PM MODI : मोदींची मोठी घोषणा ! दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळाला आहे .

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं.यावेळी त्यांनी सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला . त्त्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवण्यात येणार आहे . याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार  80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्यांचही मोदींनी नमूद केलं आहे .

दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत राशन :

मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ८ महिने मोफत राशन पुरवलं. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली.

ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभं आहे. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल.

Free Food To The Poor Till Diwali, Big Announcement Of Modi Government