WATCH : अश्व विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल सारंगखेडा यात्रेला सुरुवात; चेतक फेस्टीव्हल


विशेष प्रतिनिधी

नंदुरबार : जिल्हातील सारंगखेडा येथील यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे .या यात्रेला दत्त जयंतीपासून सुरुवात होत असून १५ दिवस ही यात्रा सुरू आहे.Turnover of crores of rupees from horse sales The famous Sarangkheda Yatra begins for the horse market

जुन्या राज – राजेवड्याचा काळापासून जातीवंत घोड्याच्या खरेदी विक्रीसाठी सारंगखेडा येथील यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे . या अश्व बाजाराला देश भरातून अश्व प्रेमी दाखल होत असतात .या घोडे बाजारातून करोडोची उलाढाल होत असते.गेल्या वर्षी कोरोना मुळे शासनाने सारंगखेडा यात्रेला परवानगी दिली नव्हती या वर्षी कोरोना मुळे व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार फक्त घोडे बाजाराला परवानगी देण्यात आली आहे.

या वर्षी आता पर्यंत १५०० च्या जवळपास घोडे दाखल झाले आहे .यात काठेवाड ,मारवाड, सिंधी,पंजाब अश्या विविध जातीचे घोडे दाखल झाले आहेत . ही यात्रा दत्त जयंतीपासून सुरु झाली असून 28 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.असे चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी सांगितले.

  •  अश्व विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल
  •  घोडेबाजारासाठी प्रसिद्ध सारंगखेडा यात्रेला सुरुवात
  •  चेतक फेस्टीव्हलमध्ये १५०० घोडे विक्रीस उपलब्ध
  •  काठेवाड ,मारवाड, सिंध, पंजाबचे घोडे दाखल
  •  यात्रा दत्त जयंतीपासून ते २८ डिसेंबरपर्यंत सुरु

Turnover of crores of rupees from horse sales The famous Sarangkheda Yatra begins for the horse market

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात