लाईफ स्किल्स : श्रवण का करावे, श्रवणाचे महत्व काय याची माहिती प्रत्येकाला हवीच..


दृश्याचे किंवा अदृश्य सूक्ष्म आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर श्रवण करावे लागते. श्रवणासाठी मन व शरीर दोन्ही तयार लागतात .मनाची एकाग्रता व शरीराचे स्वास्थ्य दोन्ही लागते. या दोन्ही गोष्टी नसतील तर श्रवण नीट होत नाही. एकाग्र चित्ताने होणारे श्रवण व त्यावरील चिंतन परमार्थ साधना होते. पण यात कसा अडथळा येतो ते समर्थ सांगतात.

श्रवण म्हणजे ऐकणे. मनन म्हणजे मनात धरणे. मनन म्हणजे धारणा. श्रवण व मननानेच या त्रेलोक्यामध्येच ज्ञान व्यवहार चालला आहे .उत्तम श्रवण घडण्यासाठी शरीर व मन तत्पर नसतील तर अडचणी येतात.Life Skills: Everyone needs to know why to listen, what is the importance of listening.

उदा. जेव्हा वक्ता बोलत असतो तेव्हा श्रोते रंगून जातात, एकाग्र होतात ,पण उशीरा येणारे श्रोते एकाग्रतेचा भंग करतात .लोकांनी अनेकांची प्रवचने ऐकलेली असतात . फार ऐकल्याने श्रोता गोंधळतो. नक्की खरे कोणते याचा संभ्रम होतो. एका जागी बसून ,दाटीवाटीत बसून शरीर अवघडते .झोप यायला लागते , जांभया यायला लागतात.

एखादा मन एकाग्र करून श्रवणाला बसला ,तरी त्याने ऐकलेलेच वक्ता सांगत असतो. त्यामुळे त्याचे लक्ष उडते. अनेकदा शरीर आवरून श्रवणाला बसले तरी श्रवणात मन लागत नाही .दुसरेच विचार मनात येतात .एकामागून एक कल्पना येत असतात .जे जे काही आपण ऐकतो ,त्याचे आपण मनन केले तरच निरुपणाने सार्थक झाले असे म्हणावे लागते. काही लोक श्रावणाला बसून आपापसात बोलतात .वक्त्याला कमीपणा देउन आपले श्रेष्ठत्व दाखविण्यासाठी विद्वान श्रोते बोलत राहतात . ह्या सर्व गोष्टींनी श्रवण साधत नाही .म्हणून समर्थ सांगतात आपले मन आपणच आवरायला हवे .कारण एकाग्र चित्ताने श्रवण आणि त्यावरील चिंतन हाच परमार्थ साधण्याचा राजमार्ग आहे.

Life Skills: Everyone needs to know why to listen, what is the importance of listening.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात