आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ; कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात दाखल


विशेष प्रतिनिधी

अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Large police contingent in front of MLA Ravi Rana’s house; A large number of activists also arived


मुख्यमंत्री ऐकत नाही, आंदोलन करणारच, आमदार रवी राणा यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा


राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टधातुचा पुतळा १२ जानेवारीला उभारला होता. मात्र तो पुतळा बसविण्यासाठी महानगरपालिकेची किंवा इतर प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नसल्यामुळे तो पुतळा अनधिकृत आहे, असा ठपका ठेवत आज पहाटे पाच वाजता महानगरपालिका व पोलिसांच्या कारवाईमध्ये पुतळा हटविण्यात आला व आमदार रवी राणा यांना पोलिसांनी नजरकैद केले आहे.

त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा तगडा बंदोबस्त दाखल झाला असून आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दाखल होऊन आपला रोष व्यक्त करत आहे.

Large police contingent in front of MLA Ravi Rana’s house; A large number of activists also arived

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात