WATCH : युती नाही झाली तर शिवसेनेचं मोठं नुकसान – रामदास आठवले


विशेष प्रतिनिधी

अमरावती : केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले हे नुकतेच अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले यांनी यावेळी आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत भाकित करत शिवसेनेला सल्ला दिला आहे. If there is no alliance, Shiv Sena will suffer a great loss

आठवले म्हणाले की, सध्या वेळ गेलेली नाही त्यामुळे शिवसेनेने भाजपसोबत आताही युती करून सरकार स्थापन करावं. जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी, नाहीतर शिवसेनेचं येणाऱ्या 2024 मध्ये खूप मोठं नुकसान होईल, असं विधान ही रामदास आठवले यांनी अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना केलं.

या सरकारमध्ये नेहमी भांडण होत असतात त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यांना लोकांच्या भल्यासाठी राज्य टिकवायचे असेल तर त्यांनी आपले भांडण मिटवले पाहिजे, असा सल्ला त्यांनी ठाकरे सरकारला यावेळी दिला.

If there is no alliance, Shiv Sena will suffer a great loss

  • शिवसेनेसाठी अजूनही वेळ गेलेली नाही
  • सेनेने भाजपसोबत युती करून सरकार स्थापन करावं
  • केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा सेनेला सल्ला
  • शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादीशी आघाडी तोडावी
  • अन्यथा 2024 मध्ये शिवसेनेचं खूप मोठं नुकसान
  • आघाडी सरकारमध्ये भांडणेच जास्त होत आहेत
  • यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात