अफगणिस्तानात आता तालिबानी राजवट, अमेरिकी दूतावासावर हेलिकॉप्टर उतरले, राजदूतांनी संवेदनशील कागदपत्रे जाळली

US helicopters in embassy kabul staff burns sensitive documents

US helicopters in embassy kabul : तालिबान्यांनी काबूलचा पाडाव केल्यानंतर अशरफ घनी यांनी राजीनामा देत सत्तेची सूत्र शांततेने तालिबानला सोपवली आहेत. तेथे अली अहमद जलाली हे हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. US helicopters in embassy kabul staff burns sensitive documents


वृत्तसंस्था

काबूल : तालिबान्यांनी काबूलचा पाडाव केल्यानंतर अशरफ घनी यांनी राजीनामा देत सत्तेची सूत्र शांततेने तालिबानला सोपवली आहेत. तेथे अली अहमद जलाली हे हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

तत्पूर्वी, तालिबान्यांनी जलालाबाद ताब्यात घेताच अमेरिकेच्या हेलिकॉप्टर्सनी अमेरिकन दूतावासावर लँडिंग केली. दूतावासाजवळ राजदूतांची सशस्त्र एसयूव्ही वाहने बाहेर येताना दिसली आणि त्यांच्या संरक्षणाची विमानांच्या घिरट्याही सतत सुरू होत्या. मात्र, अमेरिकन सरकारने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

दूतावासाच्या छताजवळ धूर उठताना दिसत होता. दोन अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, राजदूतांनी संवेदनशील कागदपत्रे जाळल्यामुळे झाला हा धूर झाला. अमेरिकेने आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. यासाठी सैनिकही पाठवण्यात आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या सैनिकांना येथून बाहेर काढण्याचा मोठा निर्णय घेतला. सैन्याची माघार 1 मे पासून सुरू झाली आणि तेव्हापासून तालिबानने देशावर कब्जा करायला सुरुवात केली.

तालिबानी राजवटीला आता अफगाणिस्तानात सुरुवात झाली आहे. अब्दुल्ला अब्दुल्ला हे अशरफ घनी सरकार आणि तालिबान यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. सध्या सरकारी फौजांनी काबूलमधील कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असे आवाहन मावळते अध्यक्ष अशरफ घनी यांनी केले आहे. खम्मा न्यूज एजन्सीने ही बातमी दिली आहे.

अफगाणिस्तानात रशिया हस्तक्षेप करणार नाही. परंतु संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत अफगाणिस्तानात या विषयावर तातडीने चर्चा घ्यावी, अशी मागणी रशियाच्या प्रतिनिधींनी केली आहे.तत्पूर्वी, तालिबानी सैन्य काबूलमध्ये घुसले. त्यांना प्रतिकार करण्यात आला नाही.

तालिबानचे प्रतिनिधी काबूलमधील अध्यक्षीय प्रासादात सत्तांतराच्या वाटाघाटी करीत आहेत. अफगाणिस्तानमधील सत्तेतील सर्व महत्वाची पदे तालिबानने आपल्याकडे मागितली आहेत. आता आलेल्या ताज्या बातमीनुसार अली अहमद जलाली यांच्याकडे तालिबानच्या हंगामी सरकारचे प्रमुख पद देण्यात येत असून अशरफ घनी यांनी अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखविली आहे. उर्वरित सत्ता पदांवर देखील तालिबानच्या वर्चस्वासह वाटाघाटी सुरू आहेत.

US helicopters in embassy kabul staff burns sensitive documents

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात