३५०० कोटींचा हिशेब आंदोलनकर्त्याकडून मागा; हरदीप पुरींनी खडसावले


  • इंडिया टुडेच्या टीव्ही डिबेटमध्ये काढले राजदीप सरदेसाईंचे वाभाडे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचे चुकीच्या नॅरेटिव्हने रिपोर्टिंग करणाऱ्या ज्य़ेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईला हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी त्याच्या शोमध्ये गप्प केले. चुकीचे नॅरेटिव्ह चालविण्यापेक्षा शेतकरी आंदोलनामुळे रोजचे राज्यांचे ३५०० कोटी रूपयांचे नुकसान होतेय. रोजगारावर प्रतिकूल परिणाम झालाय. त्याचा हिशेब आणि उत्तरे आंदोलनकर्त्यांकडून घ्या, असेही हरदीप पुरी यांनी खडसावले. hardeep puri targets rajdeep sardesai over farmers agitation

 

सरकार आज जे आश्वासन देतेय. शेतकऱ्यांना पत्र लिहिली जाताहेत, तेच आश्वासन संसदेत कृषि बिले मंजूर करतानाच का दिली नाहीत, असा सवाल राजदीपने करताच हरदीप पुरी संतप्त झाले. त्यांनी राजदीपला संसदेचे विडिओ फुटेज पाहण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी सरकारचा खुलासा करायची सरकारची तयारी होती. पण लोकसभा आणि राज्यसभेच्या वेलमध्ये कोण आले, हे तपास असे खडसावले. hardeep puri targets rajdeep sardesai over farmers agitation

हरदीप पुरी म्हणाले, पत्रकारितेत दोन्ही बाजूंचे समान रिपोर्टिंग केले पाहिजे. राजदीप तुम्ही ते करत नाही. उलट चुकीचा प्रचार करणाऱ्यांची बाजू तुम्ही उचलून धरताय. सरकार त्यावेळी संसदेत लेखी आश्वासन द्यायला तयार होते. विरोधी सदस्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची सरकारची तयारी होती. पण दोन्ही सभागृहांच्या वेलमध्ये घुसून त्यांनी गोंधळ घातला.

 

सरकारची उत्तरे ऐकायची त्यांची तयारीच नव्हती. कृषी बिलांमध्ये समाविष्ट केलेल्या अनेक सुधारणा प्रकाशसिंग बादलांनी केल्यात. ही वस्तूस्थिती आहे. आज सरकार जी आश्वासने देत आहे, तीच आश्वासने सरकार त्यावेळी देखील द्यायला तयार होते. पण ऐकून घ्यायची विरोधी पक्षांची तयारीच नव्हती. आणि आज तेच विरोधक चुकीचा नॅरेटिव्ह चालवताहेत.आणि तुम्हीही त्याचीच री ओढताहेत. ही निःपक्ष पत्रकारिता नाही, अशा शब्दांत हरदीप पुरी यांनी इंडिया टुडे टीव्हीवर राजदीप सरदेसाईंचे वाभाडे काढले.

hardeep puri targets rajdeep sardesai over farmers agitation

उलट सध्याच्या आंदोलनामुळे रोजचे हरियाणा, पंजाब, पश्चिमी उत्तर प्रदेशाचे ३५०० कोटी रूपयांचे नुकसान होतेय. रोजगारावर प्रतिकूल परिणाम झालाय. त्याचा हिशेब आणि उत्तरे आंदोलनकर्त्यांकडून घ्या, असेही हरदीप पुरी यांनी खडसावले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात