WATCH : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान : मंगळवारी निकाल जाहीर


विशेष प्रतिनिधी

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.एकूण २५७३ मतदार आहेत . सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदानासाठी १२ मतदान केंद्रे तयार केली आहेत . मंगळवारी ( दि . २३ ) मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे . निकालाची मोठी उत्सुकता जिल्ह्यात मतदान लागली आहे.For Sangli District Central Co-operative Bank Voting today: Results announced on Tuesday

शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, कॉंग्रेस नेते महेंद्र लाड हे तिघे बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी निवडणूक होत असून, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत, सहकार विकास पॅनेलचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रक्रिया गटातून इस्लामपूर हायस्कूल, इस्लामपूर येथे मतदान केले.

*१८ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात

*आघाडीच्या सहकार विकास पॅनेलचे १८ जण

* भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलचे १६ उमेदवार

* काही ठिकाणी अपक्ष उमेदवारही लढा देत आहेत

For Sangli District Central Co-operative Bank Voting today: Results announced on Tuesday

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात