CHATRAPATI SAMBHAJI RAJE : राजेंच्या डोळ्यात अश्रू … आझाद मैदान हेलावले…ठाकरे पवार सरकार मात्र अद्यापही गप्पच …! उपोषणाचा आज तिसरा दिवस


 

तुमची भक्ती आणि आमची शक्ती यांने स्वराज निर्माण होतं

 


डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही संभाजी छत्रपती सध्या उपोषणावर ठाम आहेत. हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा आहे. तो सुरूच ठेवणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजे यांच्या ट्वीटर हँडलवरूनही तसे ट्वीट करण्यात आले आहे.

 


मराठा समाजाच्या सात मागण्यांसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला बसलेल्या संभाजी छत्रपती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाही आक्रमक झाला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा भेडसावणारा प्रश्न ठाकरे-पवार सरकारकडून सुटता सुटेना झाला आहे. त्याविरोधात येऊन आता राज्य सभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे मैदानात उतरले आहेत.त्यांनी उपोषण सुरु करुन आज तब्बल ३दिवस लोटले आहेत . त्यांची प्रकृती देखील खालावत आहे .मात्र सरकार अजूनही गप्पच आहे .आज बोलतांना छत्रपती संभाजी राजेंना अश्रू अनावर झाले होते त्यांना पाहून आझाद मैदानही हेलावले … आणि उपस्थितांनी डोळे पुसले …CHATRAPATI SAMBHAJI RAJE: Tears in Raje’s eyes … Azad Maidan was shaken … But Thackeray Pawar government is still silent …! Today is the third day of the fast

मराठा आरक्षणावर सरकारकडून अजूनही कोणतंही ठोस आश्वासन देण्यात आलेलं नाही. संभाजी छत्रपती यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. बोलत असताना त्यांचा आवाज क्षीण झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कार्यावर बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

राजेंच्या डोळ्यात अश्रू पाहून आझाद मैदानात जमलेले शेकडो कार्यकर्तेही हेलावून गेले. संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती. कार्यकर्तेही गहिवरून गेले होते.

काय म्हणाले संभाजी राजे?

रामकृष्ण हरी. मी काय बोलावं? संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबा असतील नामदेवराव महाराज असतील आणि विठ्ठल-रुक्मिणीचा आशीर्वाद घेण्यासाठी हे सगळे संत असतील आणि आपण सगळेजण. शिवाजी महाराजांनी भक्ती-शक्ती केल्यामुळे हे स्वराज उभं राहिलं आणि तो आशीर्वाद (राजेंच्या डोळ्यात पाणी)…

मी छत्रपती शिवाजी महाराज, तुकोबांनी त्यांची ताकद वारकरी संप्रदायाने दिली होती. तिचं ताकद देण्यासाठी आपण इथे आलात, मी मनापासून आपला ऋणी आहे. छत्रपती केव्हा रडत नाहीत (डोळे पुसतात, तेव्हा कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा सुरू होतात) पण छत्रपतींच्या डोळ्यात केव्हा अश्रू नसतात. तुमची भक्ती आणि आमची शक्ती यांने स्वराज निर्माण होतं. आपण तेच स्वराज निर्माण करण्यासाठी आलात, तुम्हा सर्वाचं आभार, असं संभाजी राजे म्हणाले.

छत्रपती संभाजी राजे यांनी भाष्य करताना म्हटलं आहे की आज चर्चेसाठी बोलवण्यात आलेलं आहे. मात्र आता समाजाने आणि सरकारने ठरवायचं आहे की मला कुठपर्यंत न्यायचं आहे. आज जरी माझी तब्येत खालावली असली तरीदेखील मी तुसभरही मागे हटणार नाही. काही विषय हे राज्य सरकारच्या आखायतरीत्या आहेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आज मांडा असा सल्ला देखील छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारला दिला आहे. एवढंच नाही तर मराठा समाजाने देखील कायदा, सुव्यवस्था निर्माण होईल असं काहीही करू नये. मराठा समाजाचे प्रतिनिधी तिथं पाठवणार असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

CHATRAPATI SAMBHAJI RAJE: Tears in Raje’s eyes … Azad Maidan was shaken … But Thackeray Pawar government is still silent …! Today is the third day of the fast

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात