उद्या “ते” म्हणतील, पुरुषांनी चार लग्ने करणे, हा देखील महिलांचाच “चॉइस”; तसलीमा नसरीन यांचा पुरोगाम्यांना तडाखा!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : कर्नाटकातील हिजाबचा वाद देशभर पोचल्यानंतर जे राजकीय रणकंदन त्यावरून सुरू आहे, त्यामध्ये प्रख्यात बंडखोर बांगला लेखिका तसलीमा नसरीन यांनी देखील उडी घेतली आहे.Tomorrow “they” will say, having four marriages by men is also the “choice” of women; Taslima Nasreen slaps the progressives

तसलीमा नसरीन यांनी हिजाबला पाठिंबा देणाऱ्या पुरोगामी लिबरल विचारवंतांचा बुरखा फाडला आहे. आज “ते” म्हणतात हिजाब आणि बुरखा घालणे हा महिलांचा “चॉईस” आहे. उद्या ते म्हणतील पुरुषांनी चार लग्ने करणे हा देखील महिलांचा “चॉईस” आहे. जास्तीत जास्त मुले जन्माला घालणे हा देखील महिलांचा “चॉईस” आहे संपत्ती मध्ये अधिकार नाव मागणे, समान अधिकार न मागणे हा देखील महिलांचा “चॉइस” आहे, असले युक्तिवाद “ते” करत राहतील, असे ट्विट तसलीमा नसरीन यांनी केले आहे.



तसलीमा नसरीन या बंडखोर लेखिका म्हणून ओळखल्या जातात. समाजातील दांभिकतेवर त्यांनी कोरडे ओढले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात बांगलादेशातील मुस्लिम संघटनांनी शिरच्छेदाचे अनेक वेळा फतवे काढले आहेत. त्यांना त्यामुळे बांगला देशातून परागंदा व्हावे लागले आहे. त्यांनी त्यानंतर भारताचा आश्रय घेतला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस तेलंगण राष्ट्र समिती आदी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच रामचंद्र गुहा, जावेद अख्तर स्वरा भास्कर आदी भारतातील लिबरल पुरोगाम्यांनी हिजाबचे चतुराईने समर्थन केले आहे. हिजाब आणि बुरखा हा जणू काही मुस्लिम महिलांनी स्वतःहून स्वीकारलेला “चॉईस” आहे, असे हे सगळे भासवत आहेत. त्यावर तस्लिमा नसरीन यांनी आपल्या ट्विट द्वारे कोरडे ओढले आहेत.

Tomorrow “they” will say, having four marriages by men is also the “choice” of women; Taslima Nasreen slaps the progressives

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात