काँग्रेसची राजकीय नाव बुडविण्यासाठी राहुल, प्रियांकच पुरेसे; योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र


वृत्तसंस्था

लखनौ – काँग्रेसची राजकीय नाव बुडविण्यासाठी राहुल, प्रियांका गांधीच पुरेशा असून अन्य कोणाची गरज नाह, असे टीकास्त्र उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोडले. The siblings (Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra) are enough to ruin the Congress : Yogi Adityanath

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसवर जोरदार टीका केली. आदित्यनाथ यांनी आपल्या सरकारची पाठ थोपटताना काँग्रेसवर जबरदस्त निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाऊ-बहीण म्हणत राहुल आणि प्रियांका गांधी यांनाही टोला लगावला.

काँग्रेससंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसला बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, हे भाऊ-बहीण पुरेसे आहेत. आज उत्तर प्रदेशात जेवढ्या शांततेत निवडणुका होत आहेत, तेवढ्या शांततेत यापूर्वी कधीही झाल्या नाही. आमच्या सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष देण्यात आले. राज्याचा होत असलेला विकास विरोधकांना पाहावला जात नाही. यामुळेच ते अर्थहीन बडबड करत आहेत.

The siblings (Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra) are enough to ruin the Congress : Yogi Adityanath

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था