ट्विटरकडून भारताच्या नकाशाची छेडछाड; जम्मू- कश्मीर, लडाख वेगळा देश दाखवला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ट्विटरने भारताच्या नकाशाची छेडछाड केल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये जम्मू- कश्मीर, लडाख वेगळा देश दाखवला आहे. एका युजरने ट्विटरकडून नकाशात केलेला बदल उघड केला आहे. त्यानंतर ही बाब कानोकानी झाली. Tampering with map of India from Twitter; Jammu and Kashmir, Ladakh showed a different country

जम्मू- कश्मीर, लडाख हे केंद्र शासित प्रदेश आहेत. संपूर्ण भारताचे ते भूभाग असताना ट्विटरने अकारण नकाशात नाक खुपसून ते वेगळे देश दाखविले आहेत. या बाबत माहिती समजताच केंद्र सरकरने ट्विटरला नोटीस पाठविण्याचे ठरविले आहे.

यापूर्वी ट्विटरने शुक्रवारी केंद्रीय कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री यांचा ट्विटर अकाउंट एक तास ब्लॉक केला होता. सरकारने नवीन माहिती तंत्रज्ञान कायदा लागू केल्यामुळे ट्विटरचा जळफळाट झाला असून संताप व्यक्त करण्यासाठी आणि हिणवण्यासाठी हे उद्योग सुरु केल्याचे बोलले जात आहे.

नकाशा चुकीचा दाखविल्याची गोष्ट @thvaranam या नावाच्या युजरने प्रथम लक्षात आणून दिली. ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाली. नकाशाशी छेडछाड ही पोस्ट सोमवारी सकाळी १०.३८ वाजता टाकण्यात आली होती. त्यावर लिहिले होते ट्विटरील नकाशा.

Tampering with map of India from Twitter; Jammu and Kashmir, Ladakh showed a different country

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात