आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये मोदी सरकारची भरघोस वाढ; लहान मुलांच्या लसीकरणासाठी २३२०० कोटींची तरतूद


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – कोविड काळाच्या सुरूवातीला गेल्या वर्षी मोदी सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये भरघोस वाढ केल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. यामध्ये १ लाख १ हजार कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजनेबरोबरच लहान मुलांच्या लसीकरणासाठी २३,२०० कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. Atmanirbhar Bharat Rozgar Yojana has now been extended from June 30, 2021, to March 31, 2022. Over 21.4 lakh people of nearly 80,000 establishments have already benefited from the scheme

गेल्या वर्षीच्या ३ लाख कोटी रूपयांच्या इमर्जन्सी क्रेडिट लाईन योजनेच्या रकमेत केंद्र सरकारने अजून दीड लाख कोटींची भर यावेळी घातली असून त्याची विभागवार निधी वितरणाचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. २०२० मध्ये ३ लाख कोटींची क्रेडिट लाईन योजना जाहीर करण्यात आली होती. त्यातल्या २ लाख ६९ कोटींचे वितरण व्यापारी, उद्योग, बँक, आणि इतर कंपन्यांना करण्यात आले. आता त्याची मर्यादा आता ४.५ लाख कोटींपर्यंत वाढविण्यात आली आहे. अर्थात अतिरिक्त दीड लाख कोटींची वाढ करण्यात आली आहे.

२३, २२० कोटी रुपयांची घोषणा लहान मुलांसाठीच्या आरोग्य सुविधेसंदर्भातल्या (बालरोग) कामांसाठी या वर्षी ही रक्कम खर्च करण्यात येईल. ३१ मार्च २०२२ पर्यंत ही रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहितीही त्यांना दिली.

कोविड प्रभावित क्षेत्रांसाठी १ लाख १ हजार कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजना जाहीर करण्यात आली आहे. यात आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणी ५० हजार कोटींची तरतूद, तर याव्यतिरिक्त इतर विभागांसाठी ६० हजार कोटींची घोषणा सीतारामन यांनी केली.

गेल्या वेळी आत्मनिर्भर रोजगार योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या योजनेनुसार ज्या कंपन्यांची कर्मचारी संख्या १००च्या आत आहे आणि नव्याने नोकरीवर ठेवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महिना पगार १५ हजारपर्यंत आहे, अशा कर्मचाऱ्यांचा १२ टक्के पीएफचा हिस्सा आणि अशा कंपन्यांचा पीएफमधील १२ टक्के असा एकूण २४ टक्के पीएफचा हिस्सा हा केंद्र सरकारकडून भरला जाईल. आता या योजनेची मर्यादा पुढे वाढवत ३० जून २०२१ पासून ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.

Atmanirbhar Bharat Rozgar Yojana has now been extended from June 30, 2021, to March 31, 2022. Over 21.4 lakh people of nearly 80,000 establishments have already benefited from the scheme

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात