लोकसभेच्या रिंगणात उतरवल्या दोन मुली आणि एक पुतण्या; मोहिते पाटलांच्या घरात सजल्या भोजनाच्या थाळ्या!!


नाशिक : लोकसभेच्या रिंगणात उतरवल्या दोन मुली आणि एक पुतण्या; त्यांना निवडून आणण्यासाठी मोहिते पाटलांच्या घरात सजल्या भोजनाच्या थाळ्या!!, मोहिते पाटलांच्या अकलूज मधल्या “शिवरत्न” बंगल्यावर हे सगळे घडत आहे.Two daughters and a nephew who were fielded in the Lok Sabha arena; Decorated food plates in Mohite Patal’s house!!

विजयसिंह मोहिते पाटलांच्या घराण्यात भोजनावळ्या नव्या नाहीत. अगदी 1972 च्या दुष्काळात मोहिते पाटलांनी दिलेले लक्ष भोजनही गाजले होते, पण आज तसे लक्ष भोजन नाही, तर मोहिते पाटलांच्या घरात शरद पवारांची “लंच डिप्लोमसी” होत आहे. या लंच डिप्लोमसीसाठीच शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज मधल्या “शिवरत्न” या बंगल्यावर पोहोचले. तिथे स्वतः शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे हे तीन वयोवृद्ध नेते हजर आहेत. शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्या मुली सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे या लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत, तर विजयसिंह मोहिते पाटलांचा पुतण्या धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आहे.



या तिघांसमोर लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रचंड मोठे कडवे आव्हान आहे. 2024 मध्ये 2004 सारखी अनुकूल परिस्थिती नाही. उलट 2014 आणि 2019 पेक्षा मोदी लाट अधिक तीव्र आहे. या लाटेत भले भले वाहून जाण्याची भीती असताना आपापले बालेकिल्ले टिकवण्यासाठी पवार शिंदे आणि मोहिते पाटील या तिन्ही वयोवृद्ध आणि वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू आहे. आपल्या मुली आणि पुतण्या यांना निवडून आणण्यासाठीच पवारांना मोहिते पाटलांच्या घरी जाऊन “लंच डिप्लोमसी” करावी लागत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह बाकीचे अनेक स्थानिक नेते मोहिते पाटलांच्या घरी स्नेहभोजन घेत आहेत.

भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, पण ती उमेदवारी मोहिते पाटलांना “पचली” नाही. मोहिते पाटलांच्या घरात भाजपने रणजीत सिंह मोहिते पाटलांच्या रूपाने विधान परिषदेची आमदारकी दिली, पण त्याने मोहिते पाटलांची “राजकीय भूक” भागली नाही. त्यामुळेच मोहिते पाटलांनी आपल्या पुतण्यासाठी वेगळी राजकीय बेगमी करताना पुन्हा शरद पवारांच्या पक्षाची कास धरली आहे. मोहिते पाटलांच्या “शिवरत्न” बंगल्यातले स्नेहभोजन झाल्यानंतर दुपारी 4.00 वाजता राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होऊन शरद पवार त्यांची माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करणार आहेत, पण एवढी सगळी राजकीय मशागत केवळ दोन मुली आणि एक पुतण्या यांना निवडून आणण्यासाठी सुरू आहे.

“दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, पण तिला निवडून आणण्यासाठी बाप करी पायपीटी”, अशीच ही अवस्था आहे. शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे आपल्या वृद्धावस्थेत मुलींना निवडून आणण्यासाठी धडपड करत आहेत. स्वतः सुप्रिया सुळे यांनी पन्नाशी ओलांडली आहे, तर प्रणिती शिंदे यांनी चाळीशी ओलांडली आहे, पण स्वकष्टातून निवडून येण्याची क्षमता राखण्याइतपत त्या दोघी राजकीय दृष्ट्या पुरेशा सक्षम झाल्या नसल्याने त्यांची राजकीय सेटलमेंट करण्यासाठी दोघींच्या वडिलांना वृद्धापकाळात पायपीट करावी लागत आहे. विजयसिंह मोहिते पाटलांना देखील तब्येत बरी नसताना व्हीलचेअर वर बसून आपल्या पुतण्यासाठी राजकीय सेटलमेंट करावी लागत आहे.

Two daughters and a nephew who were fielded in the Lok Sabha arena; Decorated food plates in Mohite Patal’s house!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात