नाशिक : नाही सुचल्या नव्या आयडिया, एकमेकांच्या कॉप्या हाणा; ठाकरे + पवारांच्या प्रचाराची तऱ्हा!!, असे म्हणायची वेळ त्यांनीच चालविलेल्या प्रचाराच्या पद्धतीने आणली आहे. पावसात भिजून भाषणे ठोका, व्हिडिओ लावून विरोधकांना ऐकवा असलेच प्रकार पवार – ठाकरेंनी सुरू सुरू केल्याचे 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात दिसले.No new ideas of campaign have remained in sharad pawar and uddhav thackeray’s bag against Modi
2019 च्या निवडणुकीमध्ये शरद पवार साताऱ्याच्या पावसात भिजले. रानात गेले अन् ससा घावला, असला प्रकार त्यांच्या बाबतीत तेव्हा घडला. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील निवडून आले आणि राज्याचे गणित फिरले, असे बोलले गेले. शरद पवारांच्या समर्थकांनी पवार पावसात भिजल्याचे भरपूर राजकीय भांडवल वापरून घेतले.
पण त्यानंतर पावसात भिजून भाषण करण्याची फॅशन झाली. ती अगदी 2024 पर्यंत पुरली. मध्यंतरी सोलापूरच्या सभेत प्रणिती शिंदे, संजय जाधव, राजेश टोपे वगैरे नेत्यांनी अवकाळी पावसात भिजून भाषणे करताना पवारांची कॉपी हाणली.
काल परभणीत उद्धव ठाकरे देखील पावसात भिजले. त्यांनी खासदार बंडू जाधव यांच्या प्रचार सभेत पावसात भिजत उभे राहून भाषण केले. उद्धव ठाकरेंचे हे पावसात भिजण्याचे नाटक कमी पडले म्हणून की, काय शरद पवारांनी आज माढा लोकसभा मतदारसंघात “लाव रे तो व्हिडिओ” असे म्हणत राज ठाकरेंची कॉपी हाणली.
राज ठाकरेंनी 2014 च्या निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ असे म्हणत धमाल उडवून दिली होती. त्यामुळे त्यांच्या मनसे पक्षाला फार मोठा जनाधार मिळाला असे नाही, लोकांची करमणूक मात्र भरपूर झाली. लोकांची विस्मरण शक्ती कमी झाली. पण मोदींच्या याच्यावर त्याचा परिणाम झाला नाही. आता स्वतः राज ठाकरे देखील “लाव रे तो व्हिडिओ” हा राजकीय प्रयोग विसरले आहेत. त्यांनी नरेंद्र मोदींना बिनशरच्या पाठिंबा देऊन टाकला आहे.
पण पवारांकडे आता प्रचाराची कुठलीच नवी आयडिया उरली नसल्याने आणि पावसात भिजण्याची फॅशन जुनी झाल्याने पवारांनी राज ठाकरेंची कॉपी हाणली आणि आपल्या माढातल्या सभेत “लाव रे तो व्हिडिओ” म्हणत पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडिओ लावून ऐकवला. मोदींनी 50 दिवसात पेट्रोल गॅसच्या किमती कमी करण्याचे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाचे काय झाले?? त्यांनी नोटबंदी केली. देशात 100 पैकी 87 लोक बेरोजगार आहेत. मोदींनी ती बेरोजगारी हटवण्यासाठी काय केले??, असे सवाल पवारांनी तो व्हिडिओ ऐकवून मोदींनाच केले.
पण या निमित्ताने मराठी माध्यमांनी प्रतिमा निर्मिती केलेल्या चाणक्याकडे आणि त्या चाणक्याच्या नादी लागलेल्या उद्धव ठाकरेंकडे प्रचाराच्या नव्या आयडिया देखील उरलेल्या नाहीत, हे सिद्ध झाले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more