विशेष प्रतिनिधी
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये अकलूज माळशिरस मध्ये आधी ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात झालं. आता त्याचंच रिपीटेशन फलटणमध्ये झालं. In madha loksabha constituency old guards of sharad pawar returned to his fold
माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला “तगडा” उमेदवार मिळत नव्हता त्यामुळे पवारांनी “चाणक्य खेळी” करत माळशिरस मध्ये ताटातले वाटीत, वाटीतले ताटात करत आपले जुनेच सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाला आपल्या गोटात आणले आणि त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांना माढाचे तिकीट दिले.
जसा मोहिते पाटलांचा रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध होता, त्यामुळे ते पवारांच्या गोटात गेले, तसाच रामराजे नाईक निंबाळकर जरी अजित पवारांच्या गोटात आले असले, तरी त्यांचा देखील रणजीत सिंह यांना विरोध होता. त्यामुळे रामराजेंचे कुटुंब फलटणमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फोडायला उपस्थित राहिले. रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर यांनी स्वतः धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फलटणच्या श्रीराम मंदिरात वाढवला. यावेळी संजीव नाईक निंबाळकर देखील उपस्थित होते. संजीव नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फलटण तालुका अध्यक्ष आहेत.
रामराजांचे कुटुंब धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फोडायला उपस्थित राहिल्याने मराठी माध्यमांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याविरुद्ध फलटणमध्ये बंड झाल्याच्या बातम्या छापल्या. पण प्रत्यक्षात माळशिरस काय किंवा फलटण काय इथे ताटातले वाटीत आणि वाटीत ते ताटातच झाले. कारण मोहिते पाटील काय किंवा रामराजे काय, हे मूळात शरद पवारांचे समर्थक होते.
अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आल्यानंतर ते अजित पवारांसमवेत आले होते. पण भाजपमध्ये आपली डाळ शिजवून आपल्या मतानुसार माढाची उमेदवारी ठरत नसल्याचे पाहून ते शरद पवारांच्या गोटात पुन्हा निघून गेले. यापेक्षा माढात फारसे काही वेगळे घडलेले नाही. पण एवढे होऊनही रामराजे अद्याप अधिकृतरित्या अजित पवारांच्या गोटात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App