काँग्रेसचे परराष्ट्र धोरणही व्होट बँक पॉलिटिक्स आणि तुष्टीकरणाचे; जयशंकरांनी उदाहरणांसकट काढले वाभाडे!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुस्लिम तुष्टीकरण आणि व्होट बँक पॉलिटिक्स हे काँग्रेसच्या मूलभूत स्वभावातच दडले आहेत. काँग्रेस सरकारच्या परराष्ट्र धोरणातही त्याचे प्रतिबिंब पडले. त्याच्या उदाहरणांसकट परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काँग्रेसचे वाभाडे काढले.Congress foreign policy is also about vote bank politics and appeasement; Jaishankar used examples!!



पत्रकार सुशांत सिंह यांना दिलेल्या मुलाखतीत जयशंकर यांनी आपल्या परराष्ट्र सेवेतील अनुभव शेअर केले. काँग्रेसने सुरुवातीपासूनच मुस्लिम तुष्टीकरण आणि वोट बँक पॉलिटिक्स केले याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यातले एक उदाहरण देतो, असे सांगून जयशंकर म्हणाले, 1948 साली इस्रायल देश अस्तित्वात आला. भारताने त्या देशाशी साधे राजनैतिक संबंध देखील प्रस्थापित केले नाहीत. भारतातल्या काँग्रेस सरकारने 1992 मध्ये इस्रायल मध्ये आपला पहिला राजदूत पाठवला. त्यानंतर 2007 मध्ये इस्रायल मध्ये दहशतवादी हल्ला झाला, पण भारतातल्या सरकारमधल्या अनेक लोकांना त्या हल्ल्याला “दहशतवादी हल्ला” म्हणणे जड गेले. 2017 पर्यंत भारताच्या एकाही पंतप्रधानाने इस्रायला भेट दिली नव्हती. ही सगळी उदाहरणे कोणत्या परराष्ट्र धोरणाची लक्षणे आहेत??, हे मुस्लिम दृष्टीकरण आणि व्होट बँक पॉलिटिक्सची उदाहरणे वाटत नाही का?? असा परखड सवाल जयशंकर यांनी केला.

मुस्लिम तुष्टीकरण आणि व्होट बँक पॉलिटिक्स हा काँग्रेसच्या सरकारांचा अंगभूत स्वभावच बनला होता. त्यामुळे त्या सरकारच्या प्रत्येक धोरणांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडले आणि परराष्ट्र धोरणावरही त्याचा विपरीत परिणाम झाला, असे शरसंधान जयशंकर यांनी साधले.

Congress foreign policy is also about vote bank politics and appeasement; Jaishankar used examples!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात