विशेष प्रतिनिधी
अकोला : सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांचे सांगितले “आकडे”; अमित शाह यांनी काढले अकोल्यात पुरते वाभाडे!!Amit Shah targets sharad pawar over less funds given to maharashtra during UPA government
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महायुतीचे अकोला लोकसभा मतदारसंघातले उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी प्रचंड मोठी जाहीर सभा झाली. त्या सभेत अमित शाह यांनी केंद्रातले मोदी सरकार आणि मनमोहन सिंग यांचे यूपीए सरकार यांची सर्व स्तरांवर तुलना केली. ती तुलना करताना त्यांनी खूप मोठी आकडेवारी जनतेसमोर उघडपणे मांडली. त्यातली महाराष्ट्रातलीच आकडेवारी मांडताना अमित शाह यांनी मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे पुराव्यांसकट वाभाडे काढले.
अमित शहा म्हणाले, मी उद्धव ठाकरेंना आज काहीही विचारणार नाही. कारण त्यांना आदित्य ठाकरेंच्या पलीकडे महाराष्ट्राचे किंवा देशाचे काही दिसतच नाही. पण मी शरद पवार, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना निश्चित विचारणार आहे, त्यांनी त्यांच्या यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला काय दिले??, याचा हिशेब महाराष्ट्राच्या जनतेने मागावा, हे मी सांगायला आलो आहे. पण त्यांच्याकडे तसा हिशेबच नाही, कारण त्यांनी महाराष्ट्रासाठी फारसे काही केलेच नाही. पण मी सगळी आकडेवारी घेऊनच तुमच्यासमोर आलो आहे आणि ती आज तुमच्यासमोर मांडणार आहे.
सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि शरद पवारांच्या यूपीए सरकारच्या काळात त्यांनी महाराष्ट्राला 10 वर्षांमध्ये फक्त 1 लाख 91 हजार कोटी रुपये दिले, त्या उलट केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात मोदी सरकारने महाराष्ट्राला त्याच्या 7 पट म्हणजे 7 लाख 91 हजार कोटी रुपये दिले. 2 लाख 90 हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दिले. 75 हजार कोटी रुपये रस्ते बांधणीसाठी दिले, अशी तपशीलवार आकडेवारी अमित शाह यांनी अकोल्याच्या सभेत मांडून सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांच्या सरकारचे वाभाडे काढले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more