विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण जगभरातला लिबरल मीडिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लेक्चरबाजी करण्यात गुंतलाय, पण मोदींनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपल्या देशातल्या तब्बल 40 कोटी भारतीय नागरिकांना गरीबी रेषेच्या बाहेर आणले, ही अप्रतिम कामगिरी त्यांनी भारतीय विचार प्रणालीच्या बळावर करून दाखविली, असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था मॉर्गन स्टॅन्डले सीसीईओ जेमी डायमन यांनी काढले. न्यूयॉर्क इकॉनॉमिक क्लबच्या एका समारंभात ते बोलत होते. JPMorgan’s Dimon praises ‘tough’ PM Modi for doing ‘unbelievable job’ in India
यावेळी जेमी डायमन यांनी अमेरिकन आणि इतर लिबरल प्रतिनिधींना परखड शब्दांमध्ये खरी – खोटी सुनावली. लिबरल मीडिया मोदींना लेक्चरबाजी करतोय. भारताचे आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण, व्यापार धोरण कसे असावे, हे लिबरल मीडिया त्यांना सांगतोय, पण तिकडे मोदींनी आपल्या देशातल्या 40 कोटी जनतेला गरिबी रेषेच्या बाहेर आणले आणि आता ते अमेरिकेशी बरोबरीच्या नात्याने व्यापार धोरणावर बोलायची तयारी करत आहेत, हे त्यांचे अभूतपूर्व योगदान अमेरिकन जनतेने देखील मान्य केले पाहिजे, असे जेमी डायमन यांनी सांगितले.
भारतीय नोकरशाहीच्या काही विशिष्ट आडमुठ्या अडथळ्यांना देखील मोदींनी अतिशय कौशल्य पूर्वक दूर केले, याकडे जेमी डायमन यांनी अमेरिकन उद्योग क्षेत्राचे आवर्जून लक्ष वेधले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App