कूस्तीपटू सुशील कुमारची तुरूंगात प्रथिनयुक्त आहाराची मागणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कूस्तीपटू सुशील कुमारने तुरूंगात प्रथिनयुक्त आहारासाठी अर्ज केला आहे. सुशीलच्या वकीलांनुसार, त्यांच्या अशिलाची कारकीर्द ही पूर्णपणे त्याच्या शरीराच्या ताकदीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्या शरीराच्या देखभालीसाठी सकस आहारसोबत विशेष प्रथिने अत्यावश्यक असतात.त्यामुळे आवश्यक प्रथिने आणि सकस आहार न मिळाल्यास त्याच्या शरीयोष्ठीसोबत कुस्तीतील काराकीर्तीवरही परिणाम होईल. Sudhil kumar demand meal from home



सुशील ‘आयसोलेट वे प्रथिन, ओमेगा ३ व जॉईनटमेंट गोळी, सी४ व हायड, मल्टिव्हिटॅमिन जिसीजी’ सारखा आहार घेतो. दरम्यान सुशीलला सध्या कुठल्याही प्रकारचा प्रथिनयुक्त आहाराची गरज नसल्याचं तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे. २३ वर्षीय पैलवान सागर धनकरच्या हत्येच्या आरोपाखाली सुशील सध्या पोलीस कोठडीत आहे.

सदर मागणी तुरुंगातील विशेष वागणुकीसाठी नसून देशासाठी खेळणाऱ्या कुस्तीपटूच्या भविष्यातील तयारीसाठी आहे. या आहाराचा संपूर्ण खर्चही सुशीलकडून कडून करण्यात येईल असेही वकिलांमार्फत सांगण्यात आले.

Sudhil kumar demand meal from home

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात