म्युकरमायकोसीस मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा ; मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला खडसावले ; Amphotericin हे औषध योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश


म्युकर वरचं औषध योग्य प्रमाणात वाटप करण्याचाही सूचना 


विशेष प्रतिनिधी

मुंबई : म्युकरमायकोसीस मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला केली आहे. म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या आजारामुळे होणारे मृत्यू महाराष्ट्रात वाढत आहेत असं सरकारने न्यायालयत सांगितलं. ज्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ही सूचना केली आहे. एवढंच नाही तर या आजारात लागणारं औषध Amphotericin हे पण योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. Control deaths due to mucor mycosis infarction; Mumbai High Court slams Mahavikas Aghadi government

Mucormycosis अर्थात काळी बुरशी हा आजार नियंत्रणात आणण्याच्या औषधाचं उदाहरण देताना कोर्टाने दमण, दीव, दादरा नगर हवेली, लक्षद्विप, अंदमान यांची उदाहरणं दिली. अंदमान, दादरा आणि नगर हवेली तसंच लक्षद्विप या ठिकाणी म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची संख्या शून्य आहे. मात्र या ठिकाणी Amphotericin या औषधाचे 500 डोस देण्यात आले आहेत. ते का? असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे.


म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा; खासगी रुग्णालयांतील उपचारांचे दर निश्चित


म्युकरवरचं औषध वाटप करत असताना त्यामध्ये धोरण दिसत नाही. मणिपूरमध्ये म्युकरमायकोसिसचा एक रूग्ण आहे तरीही इथे 50 डोस देण्यात आले आहेत. त्रिपुरा या ठिकाणी एक रूग्ण आहे मात्र एकही डोस देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात 82 रूग्णांचा मागील 36 तासांमध्ये म्युकरमायकोसिसमध्ये मृत्यू झाला आहे. देशातल्या 23 हजार 254 म्युकरमायकोसिसच्या रूग्णांपैकी 25 टक्के रूग्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र महाराष्ट्रात औषध पुरवठा 20 टक्केच करण्यात आला आहे. या औषधाचा साठा केंद्राने वाढवायला हवा नाहीतर आणखी मृत्यू होऊ शकतात.असेही मुंबई उच्च न्यायालयाने नमुद केले आहे.

Control deaths due to mucor mycosis infarction; Mumbai High Court slams Mahavikas Aghadi government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात