कोरोनातून बरे झालेल्यांना लसीची गरज नाही, तज्ज्ञांची शिफारस; पंतप्रधानांना अहवाल सादर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत त्यांना लसीची आवश्यकता नाही, अशी शिफारस तज्ज्ञांनी पंतप्रधानांना अहवालातून केली आहे. दरम्यान, याबाबत तज्ज्ञांनीच निर्णय घ्यावा, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. Corona patients do not need vaccines, Expert recommendation; Present the report to the Prime Minister

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण केले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. पण, आता तज्ज्ञांनी पंतप्रधानांना एक अहवाल सुपूर्द केला आहे. त्यात कोरोनातून मुक्त झालेल्याना लस देण्याची गरज नसल्याचे म्हंटले आहे.

मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम आखणण्याऐवजी ज्यांना लोकांना अधिक धोका आहे अशांचं लसीकरण केलं जावे. मोठ्या प्रमाणात लसीकरण हे अपूर्ण होऊ शकते. त्यामुळे व्हायरस म्यूटेंट आणखी जास्त पसरू शकतं असे त्यांना वाटते. या तज्ज्ञांच्या समितीत एम्सचे डॉक्टर्स आणि कोविड १९ टास्कफोर्समधील सदस्यही आहेत.कोविशील्डच्या दोन्ही डोसमधील अंतर १२ आठवडे ठेवलं आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमॉलिजिस्टस आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रीवेंटिव एँड सोशल मेडिसिनच्या तज्ज्ञांनी हा रिपोर्ट बनवला आहे. त्यात म्हटलंय की, देशातील कोरोनाची सध्या आकडेवारी पाहता या काळात सर्वांसाठी कोरोना लसीकरण करण्यावर विचार करायला हवा.
सर्व वयोगटातील लोक आणि मुलांचे लसीकरण करणं योग्य राहणार नाही आणि ते परवडणारं नाही. अनियोजित लसीकरणामुळे म्यूटेंट वेरिएंटस वाढू शकतो. त्यामुळे जे कोरोनातून बरे झाले आहेत त्यांचे लसीकरण करण्याची आवश्यकता नाही.

Corona patients do not need vaccines, Expert recommendation; Present the report to the Prime Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात