केंद्रीय दलांच्या तुकड्यांवर अजूनही ममतांचा खार कायम, जवानांना परत बोलावण्याची मागणी


विशेष प्रतिनिधी

कोलकता – मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने प्रतिक्रिया देत राज्यातील कोरोना संसर्गाला आळा घालता यावा म्हणून केंद्रीय दलांच्या तुकड्या काढून घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. Mammata didi targets CRPF

राज्यात संसर्ग पसरण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप करून ममता यांनी केला. त्या म्हणाल्या केंद्रीय दलाच्या जवानांच्या नियुक्तीला ममता यांनी सुरवातीपासूनच आक्षेप घेतला आहे.



बंगालमध्ये केंद्रीय दलांचे सुमारे दोन लाख जवान नेमण्यात आले आहेत, ज्यांना कोरोनाग्रस्त राज्यांमधून आणण्यात आले आहे. हे जवान शाळा, महाविद्यालये, सुरक्षित घरे अशा ठिकाणी राहात आहेत. त्यामुळे कोरोना व्यवस्थापन कार्यवाहीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यातील ७५ टक्के जवानांना संसर्ग झालेला असू शकतो. त्यामुळे कृपा करून मतदानाच्या शेवटच्या आठव्या टप्प्यासाठी तरी त्यांना माघारी पाठविण्यात यावे.

Mammata didi targets CRPF

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात