विकृत कहाणीचा शिक्का मारून “द केरल स्टोरी” सिनेमावर ममता बॅनर्जी सरकारची पश्चिम बंगालमध्ये बंदी!!


वृत्तसंस्था

कोलकाता : लव्ह जिहाद आणि जिहादी संघटनांचे हिंसक सत्य मांडणाऱ्या “द केरल स्टोरी” या सुपरहिट सिनेमावर विकृत कहाणीचा शिक्का मारून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने राज्यात या सिनेमावर बंदी लादली आहे.Mamata Banerjee government bans the movie “The Kerala Story” in West Bengal by labeling it as a distorted story!!

“द काश्मीर फाइल्स” हा एका समुदायाला बदनाम करण्यासाठी निर्माण केलेला सिनेमा होता, तर “द केरल स्टोरी” ही विकृत कहाणी आहे. समाजात नफरत आणि हिंसा फैलवण्यासाठी हा सिनेमा बनविला आहे. त्यामुळे या सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालायचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.



ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले असून एरवी माध्यम स्वातंत्र्य, व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचा धोषा लावणाऱ्या लिबरल मंडळींना सत्य टोचते म्हणूनच ते हातातल्या सत्तेचा अनिर्बंध वापर करून “द केरल स्टोरी” सत्य सांगणाऱ्या सारख्या सिनेमावर विकृतीचा शिक्का मारून बंदी लादतात, असे शरसंधान सगळीकडून सुटले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील सिनेमावर बंदी लादण्याच्या ममता बॅनर्जींच्या सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले असून पश्चिम बंगालमध्ये रोज महिलांवर बलात्कार आणि हत्या होतात. त्यावर ममता बॅनर्जी बोलत नाहीत, पण एका सत्य सांगणाऱ्या सिनेमावर बंदी घालायला पुढे येतात यातूनच कट्टर जिहादी मानसिकतेच्या संघटनांच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची विकृत मनोवृत्ती दिसते, असे टीकास्त्र अनुराग ठाकूर यांनी सोडले आहे.

“द केरल स्टोरी” हा सिनेमा केरळ मधल्या लव्ह जिहादचे आणि तिथल्या जिहादी संघटनांचे सत्य मांडतो. मात्र त्यावर बंदी लादून ममता सरकारने पश्चिम बंगाल मधल्या जिहादी संघटनांना खुश केले आहे.

Mamata Banerjee government bans the movie “The Kerala Story” in West Bengal by labeling it as a distorted story!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात