वृत्तसंस्था
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला. काँग्रेस आणि भाजप यांच्या प्रचंड राजकीय घमासानात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेऊन 46 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात राष्ट्रवादीने 9 उमेदवार उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात मोठे स्टार प्रचारक शरद पवार यांनी प्रचार संपण्याच्या दिवशी फक्त निपाणी मतदारसंघात एक सभा घेतली. NCP announced 46, fielded 9 candidates in Karnataka; At the end of Pawar’s campaign, only meeting in Nipani
कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा मराठी माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातल्या वेगळ्या बातम्या दिल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक परफॉर्मच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतले होता. त्यामुळे कर्नाटक निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार उभे करून मतांची टक्केवारी वाढविण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा कल आहे, अशा बातम्या सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी दिल्या होत्या.
राष्ट्रवादीने आपल्या स्टार प्रचारकांची मोठी यादी देखील जाहीर केली होती. मात्र त्यात अजित पवारांचे नाव नव्हते. त्यामध्ये शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे जयंत पाटील आदी नेत्यांची नावे होती. यापैकी जयंत पाटलांनी दोन-तीन सभांना संबोधित केले, तर आमदार रोहित पवार काही ठिकाणी जाऊन आले. पण सुप्रिया सुळे कर्नाटकच्या निवडणुकीत त्या राज्यात फिरल्या नाहीत.
स्वतः शरद पवारांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 8 मे 2023 रोजी फक्त निपाणीत जाहीर सहभागी घेतली आणि तिथले उमेदवार उत्तमराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App